भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अधिवेशन यशस्वी..!
चोपडा, बातमीदार.. येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जळगाव जिल्हा अधिवेशन नगर वाचन मंदिर या ठिकाणी घेण्यात आले अधिवेशनाच्या निमित्ताने सदर वाचन मंदिराचे हॉलचे नाव स्वातंत्र्यसैनिक कैलासवासी काँग्रेस बीड गुजराती सभागृह ठेवण्यात आले होते ज्या व्यासपीठावरून अधिवेशनाचे कार्यवाही झाली.
त्या व्यासपीठाला कैलासवासी काँग्रेस व्यस्त पांडू बारीला नाव देण्यात आले होते. अधिवेशन होण्यापूर्वी महात्मा फुले नगर पासून कार्यकर्ते यांनी लाल टोप्या लाल मतदारसह लाल झेंड्यासह महात्मा गांधी पुतळा पर्यंत मिरवणूक काढली.
यात चोपडा तालुक्यातील कम्युनिस्ट पक्षाचे बीजारोपण करणारे नेते सर्वश्री स्वातंत्र्य सैनिक कॉम्रेड बिडी गुजराती, जीवन भाई गुजराती, हुंडीवाले, लातिकाबेन हुंडीवाले, कॉम्रेड जुलाल चींधु लंके, अमृत बाविस्कर, कॉम्रेड पंडितराव धनगर, कॉम्रेड माध वराव धनगर यांचे जय जय करत महात्मा गांधी पुतळ्याजवळ मिरवणूक आल्यावर लाल झेंडा अनावरण कॉ. एकनाथ महाजन यांचे हस्ते करण्यात आले व दिवंगत कामगार शहीद हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर अधिवेशन घेण्यात आले.
या अधिवेशनाच्या अध्यक्ष मंडळावर कॉम्रेड अमृत महाजन, कॉम्रेड वासुदेव कोळी, कॉम्रेड बळीराम धीवर हे होते, व्यासपीठावर काँग्रेस शांताराम पाटील, प्रभारी जिल्हा सेक्रेटरी काँ लक्ष्मण शिंदे हे होते, अधिवेशनाचे उद्घाटन करताना कॉम्रेड प्राध्यापक राम बाहेती म्हणाले की, मोदी सरकार च्या कारकिर्दीत घरघर तिरंगा कार्यक्रम राबव ला जाणार ! आरएसएसच्या धोरणानुसार तिरंगा फडकावणे निशिद्ध होते.. तसेच मोदी सरकारचा कारकीरदित संविधानाची पायमल्ली होत असून कायद्याचे राज्य राहिलेले नाही, जस्टिस लोया यांचा खून करण्यात आला. देशात अन्याय अत्याचार बलात्कार वाढत आहेत. महागाई वाढत आहे. अशा स्थितीत डाव्या धर्मनिरपेक्ष शक्ती संघटना यांनी एकत्र येऊन लढण्याची गरज आहे कार्यकर्त्यांनी एक दिलाने पक्ष पुढे न्यावा निष्क्रिय पदाधिकारी यांनी आत्मपरीक्षण करून यांनी स्वतः हुन दूर व्हावे.. असे आवाहन करून अधिवेशनाचे उद्घाटन केले, जिल्हा अधिवेशनात चांगली मिरवणूक काढली याचे मनापासून कौतुक केले, त्यानंतर झालेल्या बैठकीत येत्या सप्टेंबर महिन्यात अमरावती येथे पक्षाचे राज्य अधिवेशन घेण्यात येत असून जिल्हा जील्ह्यांनी त्यासाठी पन्नास सभासदांना एक प्रतिनिधी याप्रमाणे जिल्ह्यातील ५८० सभासदांना मागे बारा सभासद एक निरीक्षक व दोन राज्य सदस्य याप्रमाणे पंधरा सभासदांची निवड तालुका पक्ष सभासदांप्रमाणे करावी. या अधिवेशनाच्या मिरवणुकीत.. २०२१ व २२ सालचे पक्ष सभासद राहिलेले 55 कॉम्रेड व निरीक्षक म्हणून ७ प्रतिनिधी सहभागी होते.. असे त्यांनी आवाहन केले. त्यावेळी झालेल्या चर्चेत काँग्रेस निर्मला शिंदे, राजेंद्र झा यांनी देखील आपली मते व्यक्त केली.. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सर्व श्री कॉम्रेड अंबालाल राजपूत, संतोष कुंभार, वाल्मीक महराळे, रातीलाल भील, बाळू लोहार आदींनी परिश्रम घेतले. *प्रदीप जोशी, छोटू पाटील, वत्सला पाटील, जिजाबाई राणे, शशिकला निंबाळकर, बळीराम धीवर या कॉम्रेडचा सन्मान कॉम्रेड बाहेती व इतर पदाधिकारी यांनी केला* या स्टेशनला चोपडा, जळगाव, पाचोरा, अमळनेर, धरणगाव, यावल, भुसावल या आठ तालुक्यातील प्रतिनिधी आले होते.



No comments:
Post a Comment