जव्हार- जितेंद्र मोरघा :
मोखाडा तालुक्यातील शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित, अनाथ अशा मुलींना शिक्षणची व्यवस्था कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय साखरी येथे करण्यात आली आहे. परंतु तेथील चित्र वेगळे च आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून इंग्रजी व समाज शास्र विषयाला शिक्षकच नाहीत जे शिक्षक काम करत आहेत त्यांना देखील तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागते.
लाईट आहे पण पंखे नाहीत, सौर ऊर्जाचे गरम पाणी आंघोळीसाठी कधी मिळणार हा देखील प्रश्न आहे. ऐन पावसाळ्यात टॅकरने पाणी पुरवठा केला जातो.
घर घर जल देणारे शासन मुलींच्या वसतिगृहात पाणी कधी देणार असे अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत.
तरी देखील आहे त्या मानधनात हे शिक्षक उत्तम अध्यापन करत आहेत, मुलींना देखील शिक्षणाची आवड निर्माण झाली आहे व भविष्यात मोठे अधिकारी हो होण्यासाठी प्रयत्न करत आहोत अशी इच्छा त्यांनी प्रदीप वाघ यांना बोलुन दाखवली.
यावेळी मुलींची आरोग्य तपासणी वेळोवेळी केले जाते तसेच उत्तम भोजनाची व्यवस्था आहे हे देखील विद्यार्थ्यांनी सांगितले.
या सर्व समस्या बाबत मा. जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांच्या कडे मागणी करणार असल्याचे प्रदीप वाघ यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment