Saturday, 6 August 2022

इंग्रजी शाळेत विद्यार्थ्यांची गैर सोय होत असल्यामुळे बहुजन विकास आघाडीचे प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन !

इंग्रजी शाळेत विद्यार्थ्यांची गैर सोय होत असल्यामुळे बहुजन विकास आघाडीचे प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन !


 जव्हार- जितेंद्र मोरघा :

      एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत ग्रामीण भागातील आदिवासी मुलांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळण्याच्या उद्देशाने शासन करोडो रुपये खर्च करते. परंतु ग्रामीण आदिवासी मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पाठवून त्यांना योग्य शिक्षण मिळत नसल्याची तक्रार पालक करत आहेत. याचाच भाग म्हणून जव्हार मधील या मुलांच्या पालकांनी बहुजन विकास आघाडी जव्हार यांच्याकडे मुलांकडे होणारे शाळेचे दुर्लक्ष, त्यांची गैरसोय, पालक सभा न होणे या विषयीची तक्रार तालुका अध्यक्ष एकनाथ दरोडा यांच्याकडे बोलून दाखविली.

     पालकांनी केलेल्या तक्रारीची तात्काळ दखल घेत त्यांनी संबंधित पालकांना सोबत घेऊन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आयूषी सिंह यांची भेट घेऊन मुलांना होणाऱ्या गैरसोयी बद्दल माहिती देऊन सुधारणा करण्यासाठी निवेदन दिले. या भेटी दरम्यान प्रकल्प अधिकाऱ्यांनी येत्या दिवसात प्रकल्पस्तरीय कमिटी संबंधित शाळेची माहिती घेऊन मुलांची शैक्षणिक गुणवत्ता तपासली जाईल तसेच जव्हार प्रकल्पा अंतर्गत इंग्रजी माध्यमाच्या ज्या ज्या शाळांना मुले पाठवली आहेत त्या सर्व शाळांची संयुक्त सभा घेतली जातील असे आश्वासन त्यांच्या कडून देण्यात आल्याची माहिती बहुजन विकास आघाडीचे तालुका अध्यक्ष दरोडा यांनी दिली.

    या वेळी युवा आदिवासी संघाचे अध्यक्ष अशोक राऊत, राजेश वातास, अनंता झुगरे, लक्ष्मण पारधी व संबंधित पालक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...