****दौंड मध्ये १०० हुन अधिक पोलीसांसह अधिकारी झाले सहभागी****
**आमदार किसन कथोरे यांनी केला विजेत्यांचा सन्मान**
मुरबाड, ( मंगल डोंगरे ) : येत्या १५ आँगस्ट २०२२ रोजी म्हणजेच स्वातंत्र्य दिनी, संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहाने व आनंदाने विविध उपक्रमांनी अम्रुत महोत्सव साजरा केला जाणार आहे. त्या अनुषंगाने पोलीस विभागा कडूनही, सर्वत्र वेगवेगळे उपक्रम राबविण्यांत येत आहेत.
त्या उपक्रमांतर्गत ठाणे ग्रामीण अधिक्षक, श्री. विक्रम देशमाने, यांच्या नेतृत्वाखाली व पोलीस उपविभागीय अधिकारी राम भालसिंग,यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या सहकार्याने सकाळी ठिक ७.०० वाजता शिरगाव-मोहरई ते घोडदेश्वर देवस्थान मुरबाड ह्या मार्गावर ५ कि.मि.अंतराची दौंड आयोजित केली होती.या दौंडमध्ये जवळपास १०० हून अधिक पोलीस व अधिकारी सहभागी झाले होते. त्यात १) प्रथम क्रमांक-आदेश घोडके,जिल्हा मुख्यालय हेड काँन्स्टेबल २) द्वितीय-सौरभ हिंगोळे पोलीस काँंन्स्टेबल जिल्हा मुख्यालय, ३) त्रुतीय-रामेश्वर तळेकर, पोलीस उपनिरीक्षक मुरबाड पो.स्टेशन, महिलां मध्ये प्रथम-आनंदी पांचांगणे, जिल्हा मुख्यालय, द्वितीय-प्रतिभा जाधव, ग्रामीण मुख्यालय, त्रुतीय- गितांजली पारधी, मुरबाड पोलीस स्टेशन, यांवेळी आमदार किसन कथोरे हे उपस्थित होते. त्यांनी विजेत्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला. तर सर्वच उपस्थिताना मुरबाड नगरपंचायतीने उपलब्ध करून दिलेल्या तिरंग्याचे वाटप करून पोलिसांचे कर्तव्यात मनोबल वाढण्यासाठी मार्गदर्शन केले.यावेळी घोडदेश्वर, तिनहात नाका पोलीस चौकी, न्यु इंग्लिश स्कुल,व छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे,रँलीतुन ध्वज संचलन केले.
याप्रसंगी आमदार किसन कथोरे यांचे समवेत तहसीलदार संदिप आवारी, मुख्याधिकारी- परितोष कंकाळ, नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे, SDPO राम भालसिंग, वपोनि -प्रसाद पांढरे, सपोनि- अनिल सोनोने, उपनिरीक्षक- निंबाळकर, तळेकर, हे उपस्थित होते.


No comments:
Post a Comment