मुरबाड तालुक्यातील चिल्लारवाडी, शिरवली येथिल काल सायंकाळी हरवलेली तिनही मुले सुखरूप सापडल्याने प्रशासकीय यंत्रणेसह सर्वांनी सोडला सुटकेचा श्वास !!
**प्रत्यक्षात घटनास्थळी आमदार किसन कथोरे यांनी भेट देऊन हरवलेल्या त्या मुलांना कुशीत घेऊन केले मनमोकळे, **
**तहसीलदार संदिप आवारी, मुख्याधिकारी, परितोष कंकाळ, पो.नि. प्रसाद पांढरे, यांनी सर्वोतोपरी प्रयत्न केल्याने झाली भगवंताची कृपा आणि सुखरूप सापडली, ती निष्पाप बालके**
मुरबाड, (मंगल डोंगरे) : काल सायंकाळी मुरबाड तालुक्यातील,शिरवली-चिल्लारवाडी येथील जयेश सुरेश वाघ- वय वर्षे ५, नितेश मोहन वाघ -वय-५, वर्ष व रवि सुरेश आघाणे-वय ४ वर्ष, हि तिन मुले खेळता खेळता अचानक गायब झाली होती.
त्याची मिसिंग केस मुरबाड पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. मुरबाड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे, यांनी क्षणाचाही विलंब न करता, मुरबाड चे तहसीलदार संदिप आवारी यांच्याशी संपर्क साधून, पोलीस यंत्रणा, महसूल विभाग, फायरब्रिगेड, डॉकस्काँड, अशा यंत्रणा कार्यरत करून, परिसरातील नागरिक, मुरबाड नगरपंचायतचे नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे, त्यांचे सर्व सहकारी, कर्मचारी, अधिकारी यांनीही रात्रभर हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी विशेष मेहनत घेतली. मात्र ति मुले कोणालाही सापडुन आली नाहीत. खुप उशीर झाल्यामुळे शोधकार्य थांबविण्यात आले. मात्र पुन्हा आज सकाळी ६.०० वाजता शोध मोहीम सुरु केली असता, ती तिन ही मुले जंगलात सुखरूप सापडली. या शोधकार्यात सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न केले. त्या सर्वांचे ह.भ.प. रामभाऊ दळवी यांनी या शोधकार्यात अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे आभार मानुन, धन्यवाद व्यक्त केले. तर पुन्हा शोध मोहीम सुरु केल्यामुळेच बेपत्ता मुलं आज जंगलात मिळाली अशी माहिती पोलीस निरिक्षक प्रसाद पांढरे यांनी दिली.



No comments:
Post a Comment