Friday, 5 August 2022

७ आगस्ट ला चोपडा येथे 'भारतीय कम्युनिस्ट पक्षा'चे जळगाव जिल्हा अधिवेशन ! * जोरदार तयारी *

७ आगस्ट ला चोपडा येथे 'भारतीय कम्युनिस्ट पक्षा'चे जळगाव जिल्हा अधिवेशन ! * जोरदार तयारी *


चोपडा, बातमीदार.. येथे अमरचंद सभागृह नगर वाचन मंदिर येथे भारतीय कमुनिस्ट पक्षाचे २४ अधिवेशन घेण्यात येणार आहे .त्याची तयारी करण्यासाठी तालुक्यातील भाकप पदाधि कारी व कार्यकर्ते यांची बैठक आज रोजी घेण्यात आली. आज क्रांती सिंह नाना पाटील यांच्या जयंती दिन असलेने त्यांचे प्रतिमेला माल्यारपन करून अभिवादन करण्यात आले.
 
या बैठकीचे अध्यक्षस्थानी पक्षाचे ज्येष्ठ नेते वासुदेव कोळी होते. बैठकीला कॉम्रेड अमृत महाजन यांनी सविस्तर मार्गदर्शन केले त्या वर झालेल्या चर्चेत काँ शांताराम पाटील रमेश पाटील संतोष कुंभार हिराबाई सोनवणे विकास कोळी, पुंडलिक अजब सिंग राजपूत यांनी विचारविनिमय करून जबाबदाऱ्या वाटून घेतल्या. 

भारतीय कम्युनिस्ट पक्ष जळगाव जिल्ह्यात ८५ वर्षापासून कार्यरत असून या पक्षाच्या नेतृत्वाखाली शेतकरी शेतमजूर कामगार आदिवासी कष्टकरी महिला यांचे वरील अन्याय अत्याचार व त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी पक्षाने हजारो छोटे-मोठे आंदोलने झाली त्यामुळे या वर्गामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाला मानाचे स्थान आहे. महाराष्ट्र भा क प चे राज्य अधिवेशन अमरावती येथे सप्टेंबर मध्ये होणार आहे.

त्या अगोदर जिल्हा जिल्ह्यात जिल्हा अधिवेशने घेण्यात येत आहेत त्यानुसार ७ ऑगस्ट २०२२ रोजी रविवारी चोपडा येथे सकाळी १० वा मिरवणूक. व अधिवेशन होईल अशी माहिती पक्षाने भारतीय काँग्रेस पक्षाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
 पत्रकात पुढे म्हटले आहे की, चोपडा येथे १९८५ नंतर प्रथमच जिल्हा अधिवेशन होत आहे .चोपडे तालुक्याला स्वातंत्र्य चळवळीच्या काळात व नंतर स्वातंत्र्य सैनिक कॉम्रेड बि. डी. गुजराती ,कॉम्रेड जीवन भाई गुजराती, का लतिका बेन गुजराती,का अमृत भिवजी बाविस्कर, कॉ पंडित धनगर घोडगाव कॉ माधव नारायण धनगर जुलाल चंदू लंके अकुलखेडा, का लक्ष्मण सुखदेव पाटील यांनी शेतकरी शेतमजूर कामगार शिक्षक टपरीधारक वर्गासाठी मुंबई पासून चोपड्या पर्यंत केलेल्या संघर्षाची व त्यागाची परंपरा राहिली आहे स्वातंत्र्यान फैजपूर काँग्रेस नंतर पहिल्यांदा चोपडे तालुक्यातील आदिवासींच्या जमीन मागणीसाठी चोपडा ते जळगाव असा पायी लाँग मार्च कॉम्रेड स ना भालेराव व्ही बी मोरे, आंबोडेकर बुवा का, वेस्ता बारेला यांचे नेतृत्वात काढण्यात आला होता त्याची शिदोरी घेऊन चोपडा येथे जिल्हा अधिवेशन घेण्याचा निर्णय झाला आहे.
 
या अधिवेशनासाठी महाराष्ट्र भाकपचे राज्य सहसचिव काँग्रेस सुभाष लांडे (नगर) व कॉम्रेड प्रा डॉ राम बाहेती मार्गदर्शन करणार आहेत .अशी माहिती पक्षाचे राज्य कमिटी नेते कॉम्रेड अमृत महाजन जिल्हा सचिव का लक्ष्मण शिंदे यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.

अधिवेशनाच्या तयारीसाठी कॉम्रेड अमृत महाजन यांच्या मार्गदर्शनात काँ शांताराम पाटील, संतोष कुंभार ,पुंडलिक पाटील, रमेश पाटील, हिराबाई सोनवणे ,जिजाबाई राणे, प्रेमसिंग बारेला ,बाळू लोहार ,वासुदेव कोळी अंबालाल राजपूत पक्षाचे खजिनदार का सुरेश सिंधी आदींची समिती तयार करण्यात आलेली आहे .असे पत्रकार नमूद करण्यात आले आहे

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...