मोहाने येथे शिंदे गटाच्या सभासद नोंदणीला कार्यकर्त्यांची गर्दी !
कल्याण, बातमीदार : शिवसेना कुणाची याबाबत शिंदे गट व ठाकरे गट दोघांकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत. ठाणे जिल्ह्यात देखील दोन्ही गटाकडून सभासद नोंदणीसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहे. ठाणे जिल्ह्यात शिंदे यांचे वर्चस्व असल्याने ठाकरे समर्थकांकडून शिवसेना पक्षाची ताकद येथे वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वाढदिवसाच्या दिवशी पक्षातील कार्यकर्त्यांना भावनिक साद घालत प्रतिज्ञापत्र लिहून देण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर शिंदे गटानेही कार्यकर्त्यांकडून सत्यप्रतिज्ञापत्र लिहून घेण्यास सुरुवात केली आहे.
मोहने शाखा येथे आमदार विश्वनाथ भोईर यांचे मार्गदर्शनाखाली शिंदे गटाकडून सभासद नोंदणी सुरू करण्यात आली आहे. या सभासद नोंदणीला शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेवक उद्योगपती समाजसेवक मयूर शेठ पाटील यांचे मोठं सहकार्य होते. तसेच याप्रसंगी माजी नगरसेवक जयवंत भोईर, समाजसेवक अंकुश जोगदंड, तसेच इतर कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौजन्य ; इंडिया टी. व्ही. न्युज नेटवर्क, कल्याण

No comments:
Post a Comment