औरंगाबाद दि २७ सप्टेबंर: सिल्लोड शहर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन , व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. चेअरमन पदी राजेंद्र भीका बन्सोड तर व्हाईस चेअरमनपदी टेकचंद बाबुराव दुधे यांची बिनविरोध निवड झाली. उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्याहस्ते नूतन चेअरमन , व्हाईस चेअरमन व संचालकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी दुय्यम निबंधक ज्ञानेश्वर मातेरे, नगरसेविका शकुंतलाबाई बन्सोड, नगरसेवक शेख सलीम हुसेन, सुनील दुधे , पांडुरंग डवणे, फहिम पठाण, संदीप हाडोळे, संतोष धाडगे, यांच्यासह सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक नंदकिशोर विठ्ठलराव सहारे, विठ्ठल म्हतारजी सपकाळ, किशोर हरीलाल अग्रवाल, पठाण जाफरखान तैवरखान, अब्दुल रहेमान शेख भिकन, सुरेश अंबादास प्रशाद, मोहंमद युसूफ गुलाम जीलानी, प्रभाकर कोंडीबा दुधे, मीराबाई पांडुरंग पाटील, संगीताबाई रामेश्वर भाग्यवंत यांच्यासह आदींची उपस्थिती होती
No comments:
Post a Comment