Friday, 9 September 2022

रोटरी क्लब व आनंद सुपर शॉपी यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश आरास स्पर्धेत अनेकांना बक्षीस !

रोटरी क्लब व आनंद सुपर शॉपी यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश आरास स्पर्धेत अनेकांना बक्षीस !


चोपडा, (प्रतिनिधी) - येथील रोटरी क्लब आणि आनंद सुपर शॉपी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गणेश आरास स्पर्धत गणपती बाप्पा साठी पर्यावरण पूरक सजावट करणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळास व वैयक्तिक घरगुती गणेश मंडळासाठी विविध प्रकारच्या बक्षिसांची मेजवानी आनंद सुपर शॉपी तर्फे ठेवण्यात आलेली होती. यात सार्वजनिक गणेश मंडळातून हरेश्वर गणेश मंडळ, चोपडा या मंडळाने पहिले १००१ रुपयांचे बक्षीस पटकावले असून द्वितीय नंबर विवेकानंद विद्यालय, चोपडा ७०१ रुपयाचे तर तृतीय बक्षीस बाल शिवबा मित्र मंडळ, चिंचोली तालुका यावल ५०१ रुपये यांनी पटकावला तसेच घरगुती गणेश भक्त नक्षत्रा दिगंबर पाटील, चोपडा या प्रथम पारितोषिक ५०१ रुपयाचे मिळवलेले आहे तर द्वितीय क्रमांक गुरुदास काशिनाथ महाजन, चहार्डी यांनी ३०१ रुपयाचे बक्षीस मिळवलेले आहे तर तृतीय अर्णव नितीन अहिराव, चोपडा यांनी २०१ रुपयाचे पारितोषिक मिळवलेले आहे, रोटरी क्लब व आनंद सुपर शॉपी यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या एका छोट्या खाणी कार्यक्रमात हे बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी रोटरी क्लब व आनंद सुपर शॉपी चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...