मुसळधार पाऊसामुळे घराची भिंत कोसळल्याने नुकसान !
जव्हार- जितेंद्र मोरघा :
मोखाडा तालुक्यातील कारेगाव येथील चंदर शंकर सप्रे यांच्या घराची भिंत रात्री मुसळधार पावसामुळे पडली असुन घरातील वस्तूंचे नुकसान झाले आहे.
सुदैवाने जिवितहानी झाली नाही. घराची भिंत पडल्यामुळे संपूर्ण घराला धोका निर्माण झाला आहे.
या संपूर्ण घटनेची माहिती प्रदीप वाघ यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व सदरची माहिती तहसिलदार, तलाठी, सर्कल यांना दिली.
यावेळी ग्रामसेवक दोंदे, निलेश ठोमरे,लक्ष्मण ठोमरे, वासुदेव आघाण हिरामण ठोमरे,अकाश ठोमरे व ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:
Post a Comment