जळगाव, प्रतिनिधी : एरंडोल येथील रहिवासी जितेंद्र पाटील हे कल्याण येथे आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन च्या माध्यमातून रुग्णाची सेवा करत आहे. त्यांची सेवा पाहून त्यांना लोक आता देवदूत म्हणून त्यांच्याकडे पाहत आहेत.
कु. रिद्धी रोहिदास पाटील वय : 3 महिने ( जुवार्डी, ता. भडगाव, जि. जळगाव)
कुमारी रिद्धी रोहिदास पाटील हिला जन्मताच हृदयामध्ये होल होतं. रिद्धीचे आई-वडिलांनी तिला जळगाव. नाशिक, मुंबई, पुणे अशा भरपूर शहरांमध्ये जाऊन हॉस्पिटलचे चक्कर मारले. पण तरी त्यांना कोणी मदत करत नव्हते. आणि ऑपरेशनच्या खर्च ३ ते ४ लाखापर्यंत येणार होता असं हॉस्पिटलमध्ये सांगण्यात आले होते. रिद्धीच्या आई-वडिलांकडे तेवढा पुरेसा पैसा नाही होता. त्यांना कोणाकडे संपर्क करावे हे त्यांना कळत नव्हते. आणि डॉक्टरांनी त्यांना हृदयातील होल वाढत आहे लवकर ऑपरेशन करावे लागेल. अशी भीती डॉक्टरांनी त्यांना दिली होती. रिद्धीच्या वडिलांच्या संपर्कामध्ये भीमराव सपकाळ यांच्या नंबर भेटला. भीमराव सपकाळ यांनी तात्काळ आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांच्याशी संपर्क करा असं सांगण्यात आले. रिद्धीच्या वडिलांच्या संपर्क श्री जितेंद्र पाटील यांच्या जवळ झाल्यानंतर रिद्धीचे सर्व रिपोर्ट्स श्री जितेंद्र पाटील यांच्या व्हाट्सअप द्वारे मागून घेतले. रिपोर्ट बघून श्री जितेंद्र पाटील यांनी रिद्धीच्या आई वडिलांना धीर दिला. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका काही चिंता करू नका तुम्ही तात्काळ मुलीला घेऊन ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये मुलीला घेऊन या. ज्युपिटर हॉस्पिटलमधील डॉक्टरांजवळ माझे बोलणे झालेले आहे. तुम्हाला कुठल्याही खर्च त्याठिकाणी द्यावा लागणार नाही आहे. सर्व मोफत मध्ये होणार आहे. हे ऐकून रिद्धीच्या आई-वडिलांनी रिद्धीला घेऊन तात्काळ ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले. रिद्धीचे काही रिपोर्ट्स व फिटनेस घेऊन तिची शस्त्रक्रिया करण्यात आली. रिद्धीची हृदयाची शस्त्रक्रिया एकदम सुखरूप पार पडले. रिद्धीला तीन दिवस आयसीयूमध्ये निरीक्षण साठी ठेवण्यात आले होते. चौथ्या दिवशी रिद्धीला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. 8 व्या दिवशी रिद्धीला हॉस्पिटल मधून सुट्टी करण्यात आली.
रिद्धी आता तिच्या घरी एकदम ठणठणीत आहे. रिद्धीच्या आई-वडिलांनी आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांचे खूप खूप आभार मानले...



No comments:
Post a Comment