Wednesday, 7 September 2022

मंगळवारपासून कुष्ठरोग शोध अभियान मोहीम ! "सर्वेक्षणास सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन"

मंगळवारपासून कुष्ठरोग शोध अभियान मोहीम !

"सर्वेक्षणास सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन" 


बुलडाणा, दि. ७ : जिल्ह्यात मंगळवार, दि. १३ सप्टेंबर पासून कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येणार आहे. ही मोहिम‍ दि. ३० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या मोहिमेत जास्तीत जास्त रूग्णांचा शोध घेऊन उपचार सुरू करावा, तसेच नागरिकांनी या सर्वेक्षणास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी केले. 

राष्ट्रीय कुष्ठरोग निमुर्लन कार्यक्रमांतर्गत कुष्ठरोग शोध अभियान आणि राष्ट्रीय क्षयरोग शोधमोहीम प्रभावीपणे राबविण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समिती सभा घेण्यात आली. 

जिल्ह्यातील २३ लाख ७५ हजार २२६ लोकसंख्येचे सर्वेक्षण १ हजार ८३६ सर्वे पथकामार्फत होणार आहे. नागरिकांनी सर्वेक्षण कालावधीमध्ये घरी येणाऱ्या पथकामार्फत क्षयरोग व कुष्ठरोगाबाबत तपासणी करुन आरोग्य विभागास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांोनी केले आहे. सभेत सर्वेक्षण अभियान प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

कुष्ठरोगाची लक्षणे ही त्वचेवर फिकट, लालसर बधीर चट्टा आणि त्या ठिकाणी घाम न येणे, जाड, बधीर, तेलकट, चकाकणारी त्वचा, त्वचेवर गाठी असणे, कानाच्या पाळ्या जाड होणे, हातापायाची बोटे वाकडी असणे, मुंग्या येणे, बधीरता असणे, भुवयाचे केस विरळ होणे, डोळे पूर्ण बंद करता न येणे, त्वचेवर थंड आणि गरम संवेदना न जाणवणे आहेत. 
क्षयरोगाची लक्षणे दोन आठवड्यातून अधिक कालावधीचा खोकला, दोन आठवड्यातून अधिक कालावधीचा ताप, वजनात लक्षणीय घट, थुंकी वाटे रक्त पडणे, मानेवर गाठी आदी लक्षणे आहेत.
सभेला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. खिरोडकर, डॉ. प्रशांत तागडे, यास्मीन चौधरी, रामेश्वर बाबल, जिल्हा मलेरीया अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, प्राचार्य, सोशल सायन्स, नर्सिंग कॉलेज, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा डॉ. किसन राठोड उपस्थित होते.
 

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...