Saturday 10 September 2022

सुप्रसिद्ध डावा साऊंडचे मालक संजय होरंबे यांच्या मुलीने साकारली पर्यावरण पूरक गणेश मूर्ती !

सुप्रसिद्ध डावा साऊंडचे मालक संजय होरंबे यांच्या मुलीने साकारली पर्यावरण पूरक गणेश मूर्ती !


*[निवोशी/गुहागर : उदय दणदणे]*

अवघा कोकण भक्तिमय होतो अशा आपल्या बाप्पाचं श्री गणरायाचे स्वागत सर्वत्र होत अवघा कोकण आनंदात न्हाऊन गेला होता. *"गणपती बाप्पा मोरया!! मंगलमूर्ती मोरया !!"* जयघोषाने प्रत्येक गाव व वाडीवस्ती घरात जल्लोष, आनंदोत्सव साजरा होत होता.

लहान मोठयांचा अगदी सर्वांचाच आवडीचा सण अर्थात गणेशोत्सव होय.


हाच गणेशोत्सव पानवल (होरंबे वाडी) ता. जि. रत्नागिरी येथील कु. सना संजय होरंबे या पाचवीत शिकणाऱ्या मुलीने समाजाला पर्यावरणाचं संवर्धन होण्याच्या हेतूने संदेश देत शाडूच्या मातीपासून पर्यावरण पूरक अशी सुबक गणपती मूर्ती साकारून ती गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजेसाठी स्थापन्न करून तिची मनोभावे पूजा अर्चा करून शुक्रवार दिनांक ०९ सप्टेंबर २०२२ रोजी अनंत चतुर्थीच्या दिवशी अगदी जल्लोषात गणेश मूर्तीचे विसर्जन करून पुढच्या वर्षी लवकर या... अशी बाप्पाकडे प्रार्थना करत निरोप दिला. 

कु. सना होरंबे ही रत्नागिरीतील सुप्रसिद्ध साऊंड मास्टर (DAVA SOUND) अशी ख्याती असणारे डावा साऊंडचे मालक श्री संजय होरंबे (पानवल) यांची मुलगी होय.तर जि. प.पूर्ण प्राथमिक शाळा- पानवल (होरंबेवाडी) ता.जि. रत्नागिरी या शाळेची इयत्ता पाचवीत शिकणारी विद्यार्थिनी असून अभ्यासातही खुप हुशार असल्याने प्रतिवर्षी शालेय परीक्षेत ती प्रथम क्रमांकाने पास होण्याचा बहुमान मिळवत आहे.

स्मितहास्य असणारी कु. सना होरंबे हिला चित्रकलेची व नवनवीन वस्तु बनवण्याची आवड असून त्यातूनच ही शाडूच्या मातीची मूर्ती बनवण्याची संकल्पना सुचली आणि आपल्या कल्पकतेने कलाकौशल्य कृतीतून ती साकार ही केली. याचे सर्व श्रेय तिची आई सौ. सांज होरंबे यांना जाते त्यांनी कु. सनाच्या अंगीकृत असलेल्या कला गुणांना वाव देत प्रोत्साहन देण्याबरोबरच इयत्ता नववीत शिकत असलेली त्यांची मोठी मुलगी कु.सिमरन होरंबे, अतिशय शांत, नम्र स्वभावाची असून तिचा आत्मविश्वास चिकाटी हा गुण वाखाणण्याजोगा आहे. तिला जबाबदारीने दिलेलं कोणतंही काम ती मन लावून पूर्ण करते. उत्कृष्ट रांगोळी रेखाटन बरोबरच छान चित्रं काढते. 

फिनॉलेक्स अकॅडमीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत तिने उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला होता तर पंचायत समिती, रत्नागिरी आयोजित MHM च्या काव्य स्पर्धेतही तिने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. त्याचबरोबर ती उत्तम कविता लेखन करत चारोळी, अंताक्षरी, अभंग, बडबडगीते अशा विविध प्रकारात तिने काव्यलेखन सहित सादरीकरण केले आहे.

कार्यानुभवच्या वस्तूही ती आपल्या कल्पकतेने अगदी आवडीने तयार करते. कु. सना, कु. सिमरन दोन्ही मुली भविष्याकडे यशस्वी गरुडझेप घेत असल्याच्या मागे त्यांचे आई -बाबा श्री संजय होरंबे, सौ.सांज होरंबे यांचे अथक परिश्रम व त्यांनी केलेले बाळमनावरील संस्कार याचे फलीत म्हणजेच कु. सना आणि सिमरन या त्यांच्या दोन्ही लाडल्या मुली आणि याच दोन्ही मुली त्यांच्या वंशवलीची खरी ताकद आणि अभिमान आहेत.

No comments:

Post a Comment

भिवंडी मतदारसंघात बदलाचे वारे !!

भिवंडी मतदारसंघात बदलाचे वारे !! ** सर्व सामान्यांचे नेतृत्व सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांना वाढता पाठिंबा भिवंडी, प्रतिनिधी ...