Tuesday, 27 September 2022

"आज झालेले मंत्रीमडळाचे निर्णय"

"आज झालेले मंत्रीमडळाचे निर्णय" 


मुंबई, अखलाख देशमुख, दि २७ : मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतील मंत्रिमंडळ निर्णय....

✅ राज्यात फोर्टीफाईड तांदळाचे दोन टप्प्यात वितरण करणार. 

✅ विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरीत महाराष्ट्र या तीनही विकास मंडळांचे पुनर्गठन होणार.

✅ नगर विकास विभागाच्या प्रशासकीय कामकाजासाठी व राज्य शहर नियोजन संस्थेकरिता पायाभूत सोयी-सुविधा निर्माण करणारी योजना.

✅ पोलीस शिपाई संवर्गातील २०२१ मधील सर्व रिक्त पदे भरण्यासाठी पदभरती निर्बंधामधून सूट. एकूण २० हजार पदे भरणार.

✅ इतर मागास प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतीगृहे सुरु करणार.

✅ इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास या प्रवर्गातील गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ आता ५० विद्यार्थ्यांना मिळणार.

✅ अल्पसंख्याक समुदायातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुधारित शिष्यवृत्ती योजना राबविणार. शिष्यवृत्तीच्या रकमेत ५० हजारापर्यंत वाढ. 

✅ वन विभागाच्या अधिकारी-कर्मचारी यांचा वणवा, प्राणी हल्ला, तस्कर-शिकारी यांच्या हल्ल्यात, वन्य प्राण्यांचा बचाव करतांना मृत्यू झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यास वारसांना लाभ देणार

✅ राज्यातील शासकीय वैद्यकीय, दंत, आयुर्वेद महाविद्यालयातील पूर्ण ग्रंथपाल, शारिरीक शिक्षण निर्देशकांना सातवा वेतन आयोग लागू.

✅ दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिकाऱ्यांना दुसऱ्या राष्ट्रीय न्यायिक वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार सुधारित वेतन लागू करण्याचा निर्णय 

✅ महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०२१ मागे घेण्याचा निर्णय.

✅ महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) अधिनियम सुधारणाचे विधेयक मागे घेण्याचा निर्णय. दुरुस्तीसह पुन्हा लागू होणार.

✅ एअर इंडियाकडून एअर इंडिया इंजिनीअरींग सर्व्हीसेस लिमिटेड या कंपनीस हस्तांतर होणाऱ्या ५० एकर जमिनीच्या मुल्यावरील मुद्रांक शुल्क माफ.

✅ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाला बॅ.नाथ पै विमानतळ असे नाव देणार

No comments:

Post a Comment

वाढत्या रिक्षाच्या संख्येमुळे रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ !!

वाढत्या रिक्षांमुळे उत्पन्नात घट ; रिक्षा चालकांचे घटत आहे उत्पन्न.... ***वाढत्या रिक्षाच्या संख्येमुळे रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ. ...