*विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची केंद्र सरकारवर टीका*
जुन्नर, अखलाख देशमुख, दि. २७ - पिकाला योग्य हमी भाव द्या या शेतकऱ्यांच्या मागणी व त्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं जातं, मात्र अदानी अंबानीला मोठया प्रमाणात सवलती दिल्या जातात, असा भेदभाव केला जात असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पंतप्रधानांच्या सबका साथ सबका विकास या घोषणेवर केली.
पंतप्रधानांना त्यांच्या वाढदिवशीच शुभेच्छा देऊन आपल्या जीवनाचा शेवट केलेले शेतकरी दशरथ केदारी यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देणार अशी ग्वाही अंबादास दानवे यांनी त्यांच्या कुटुंबियांना दिली. जुन्नर तालुक्यातील बनकर येथील निवासस्थानी अंबादास दानवे यांनी केदारी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.
राज्यात मोठया संख्येने होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे खेदजनक असल्याचे दानवे यांनी म्हटले. राज्यातील अतिवृष्टीबाबत असलेले नियम हे इंग्रज्यांच्या काळापासून लावले आहेत ते आजही सुरू आहेत. एका मंडळात ६५ एमएम पाऊस
होणे आवश्यक असतं, मात्र अनेकदा अतिवृष्टी झाली की त्या मंडळात पर्जन्यमापक यंत्रक नसत, त्यामुळे त्या भागाला अतिवृष्टी पासून वंचीत राहावं लागतं असल्याचे त्यांनी म्हटले.
एकीकडे कांद्याला योग्य भाव मिळत नाही तर दुसरीकडे अतिवृष्टीमुळे साठवलेला कांदा सडतोय अशा दुहेरी मार जुन्नरमधील कांदा उत्पादक शेतकरी सहन करतोय. यातूनच दशरथ केदारी या शेतकऱ्याने पंतप्रधानांना त्यांच्या वाढदिवशीच शुभेच्छा देत आत्महत्या करत प्रातिनिधीक स्वरूपात केंद्राचा निषेध केला आहे. मात्र या घटनेकडे राज्याचे व पर्यायी केंद्र सरकारचेही दुर्लक्ष झाले हे खेदजनक असल्याची प्रतिक्रिया दानवे यांनी दिली.
यावेळी तहसिलदार रविंद्र सबनीस, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शरद चौधरी, माजी आमदार बाळासाहेब दांगट, मार्केट कमिटी सभापती दिलीप डुंबरे, तालुका प्रमुख ज्ञानेश्वर खंडागळे, उदापूरचे सरपंच रवी आंबेकर, बबन कुलुडे, प्रसन्ना डोके, राहुल सुकाळे, प्रभाकर शिंदे,अशोक शिंदे, शरद डमढेरे, राजू नारुडकर,विशाल बनकर व अन्य प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment