समाजात अध्यात्मिक वाढविण्यासाठी किर्तनकारांचे योगदान महत्त्वाचे - 'उच्च शिक्षण मंत्री ; चंद्रकांत पाटील'
कल्याण, (संजय कांबळे) : ज्या परिसरात किर्तनकारांची संख्या जास्त आहे तेथे महिलांवर अत्याचार, चोरी, मारामारी, फसवणूक, वाईट घटना किंवा गोष्टी घडायला नाही पाहिजे, कारण समाजात अध्यात्मिक वातावरण निर्माण करण्यासाठी किर्तनकारांचे योगदान खूप मोठे आहे. असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गोवेली येथील जीवनदीप महाविद्यालयात आयोजित किर्तनकारांच्या जाहीर सत्कार समारंभात बोलताना केले.
यावेळी व्यासपीठावर आमदार किसन कथोरे, कुमार आयलानी, माझी आमदार नरेंद्र पवार, विद्यालयाचे अध्यक्ष रविंद्र घोंडविदे आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले, शिक्षण पध्दतीत अमुलाग्र बद्दल करण्यात आला आहे. शिक्षण हे मातृभाषेतून मिळाले पाहिजे असे सांगताना ते म्हणाले, यापुढे प्राधापकांनी जरी इंग्रजी मधून शिकवले तरी विद्यार्थ्यांना ते मराठीतून ऐकू येईल असे यंत्र विकसीत करण्यात येईल. यामुळे मुलांना व्यवहारात टिकता आले पाहिजे.असे बोलून जीवनदीप विद्यालयाने यापुढे कौशल्य विकास वाढविला पाहिजे असा आग्रह चंद्रकांत पाटील यांनी धरला यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
तर आमदार किसन कथोरे यांनी आपल्या छोटेखानी भाषणात सांगितले की, हे विद्यालयात एका छोट्या गावातील मुलाने सुरू केले सुरुवातीला टिका झाली, हे चालेल का ? असा प्रश्न उपस्थित केला गेला, मात्र आज ९०० काॅलेज मध्ये हे 'टॉप टेन' मध्ये आहे, याचा अभिमान वाटतो. विद्यालयाच्या अनेक विद्यार्थ्यांनी नावलौकिक मिळवला आहे, या परिसरात लॉ काॅलेज ची उणीव या विद्यालयांने भरून काढली आहे. आपण आपल्या मतदार संघात अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविले असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये कन्यादान योजना, महिलांचे हिमोग्लोबिन, आदी चा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
तर प्रास्ताविक करताना विदयालयाचे अध्यक्ष रविंद्र घोंडविदे यांनी सांगितले की, मी अंत्यत गरीब परिस्थितीत शिक्षण घेऊन आज या ठिकाणी पोहचलो आहे, गोवेली सह खर्डी, म्हसा आदी ग्रामीण भागातील शिक्षण सुरू केले. एक रुपयांत प्रवेश सुरू केला, आज अनेक विद्यार्थ्यांनी क्रिडा क्षेत्रात रेकॉर्ड केले आहेत, हे सर्व आईवडिलांच्या संस्कारामुळे शक्य झाले आहे. असे त्यांनी सांगितले.
यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते परिसरातील किर्तनकारांचा जाहीर सत्कार करण्यात आला, तसेच विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला, याप्रसंगी काही पुस्तकाचे प्रकाशन देखील करण्यात आले. यावेळी कांबा ग्रामपंचायतीचे मा. सरपंच मंगेश बनकरी यांनी भली मोठी समई चंद्रकांत पाटील यांना भेट दिली. उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विद्यालयात प्रवेश करताच कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी, यांच्या सह अनेकांनी त्यांचे स्वागत केले. अत्यंत नियोजन बध्द कार्यक्रमाचे श्री पाटील यांनी कौतुक केलं.
No comments:
Post a Comment