Saturday, 10 September 2022

समाजवाद व धर्मनिरपेक्ष धोरणासाठी संघर्ष करणाऱ्या "भारतीय कम्युनिस्ट पक्षा"ला साथ द्या...

समाजवाद व धर्मनिरपेक्ष धोरणासाठी संघर्ष करणाऱ्या "भारतीय कम्युनिस्ट पक्षा"ला साथ द्या... 

*चोपडा तालुका अधिवेशनाची हाक*


चोपडा, प्रतिनिधी.. हल्लीचे देशातील राज्य राज्यातील राजकारण पाहिले तर तत्व ध्येयनिष्ठा यावरील राजकारण संपवून टाकले आहे. तिकीट किंवा पद मिळाले नाही तर बदलला पक्ष.... असे निर्लज्ज वर्तन व चित्र दिसते. 


पक्षाच्या ध्येय धोरणासाठी संघर्ष करणारे कार्यकर्ते व नेते शोधून सापडत नाही असे भेसूर चित्र दिसत आहे तेव्हा जनतेने या स्थितीचे अवलोकन करावे. सद्यस्थितीत देशात डावे विचाराचे पक्ष अपवादात्मक आहेत. जनतेने डाव्या पक्षांना मजबूत करून शोषित जनतेच्या हितसंबंध व लोकशाहीचे रक्षण करावे असे आवाहन चोपडा येथे नगर वाचन मंदिरात "भारतीय कम्युनिस्ट पक्षा"च्या चोपडा तालुका अधिवेशनात पक्षाचे नेते काम्रेड अमृत महाजन यांनी मार्गदर्शन करताना केले. या अधिवेशनाच्या सुरुवातीला भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या लाल झेंड्याचे अनावरण पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड लक्ष्मण शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले, या अधिवेशनात सुरुवातीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉ. स. ना. भालेराव, अमळनेर कामगार लढ्याचे शहीद श्रीपत पाटील यांच्या प्रतिमांना मान्यवरांनी माल्यार्पण केले नंतर अधिवेशनाची सुरुवात कॉम्रेड वत्सला पाटील, सुखदेव भील, अशोक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली व अधिवेशनला सुरुवात झाली, अधिवेशनाचे उद्घाटन पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. लक्ष्मण शिंदे यांनी केले, त्यांनी उद्घाटनपर भाषणात मोदी सरकार जनतेच्या प्रश्नाकडे कमी तर भावनिक मुद्द्यावर मंदिरे, धर्मवाद बरोबर गावांचे नाव बदलणे, रस्ते नावे बदलणे असे उपद्व्याप करीत आहे. महागाई, बेरोजगारी, कोविडची महामारी याकडे कमी लक्ष देत आहे. सध्या देशात कष्टकरी जनतेने एकजूट करण्याची गरज आहे, असे त्यांनी आपल्या भाषणात आवाहन केले. जिल्हा कामाचा अहवाल सादर केला. या अधिवेशनात रमेश पाटील यांनी ग्रामपंचायत कर्मचारी यांचे थकीत पगार वाढ द्यावी. वत्सला पाटील यांनी आशा वर्कर अंगणवाडी कर्मचारी यांना शासकीय कर्मचारी मानून त्याप्रमाणे वेतन द्यावे. शेतकरी शेतमजूर यांना पाच हजार रुपये पेन्शन द्यावे, तसेच प्यारींबाई बारेला यांनी आदिवासींना वन जमिनीचे प्रकरणे निकाली काढावीत, त्यांना शेतीविषयक कर्ज विहिरी द्याव्यात, असे तीन ठराव पास करण्यात आले. अधिवेशनाचे सूत्रसंचालन कॉ. रमेश दिगंबर पाटील यांनी केले. सुरुवातीला पक्षाचे दिवंगत नेते काम्रेड अभिमन पाटील, अमळनेर- इंदोर अपघातात मृत ११ प्रवाशी, आत्महत्या केलेले शेतकरी, शेतमजूर तसेच शेतकरी आंदोलनात शहीद झालेले शेतकरी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 


या अधिवेशनात पक्षाचे निष्ठवान जेष्ठ कार्यकर्ते कॉम्रेड वासुदेव कोळी. काम्रेड सरलाबाई देशमुख, गुप्त्यारबाई तडवी यांचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर काम्रेड शशिकला निंबाळकर, जिजाबाई राणे, मिनोक्षी सोनवणे, स्थानापन्न होत्या सर्व कॉ. हिराबाई सोनवणे, प्यारीबाई बारिला, छोटू पाटील, अंबालाल राजपूत, इरफान मणियार, किशोर पाटील, विद्यादेवी बाविस्कर, ढगोबाई भोई, सविता चौधरी, वासुदेव बडगुजर, दिनेश कोळी, बाळू लोहार, मनीषा पाटील, सुमनबाई माळी, सुभाष कोळी आधी कार्यकर्त्यांचा सहभाग होता त्यावेळी चोपडे तालुक्यातील २८ शाखांपैकी शाखांचे ३९/४० कॉम्रेड हजर होते.

*या अधिवेशन मध्ये.एकवीस कार्यकर्त्यांची तालुका कौन्सिल निवडण्यात आली*

*अमरावती राज्य कौन्सिल अधिवेशनात तालुक्यातील २९० सभासदांचे प्रतिनिधित्व करणारे ८ प्रतिनिधी ही निवडण्यात आले* 

*अधिवेशनाचे व्यासपीठाला कॉम्रेड वेस्ता पांडू बारेला विचार मंच नाव देण्यात आले होते*

No comments:

Post a Comment

श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान तर्फे शैक्षणिक वारी !!

श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान तर्फे शैक्षणिक वारी !! आषाढी एकादशी पंढरपूरच्या विठ्ठलाला साकड, मागणं, किंवा भेट घेण्यसाठी अनेक जन ...