पुणे, दि. ६ : केंद्र शासनाच्या वतीने मेजर ध्यानंचद खेलरत्न पुरस्कार, खेळामध्ये यश संपादन केल्याबद्दल ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार, विद्यापीठांकरीता मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी, द्रोणाचार्य पुरस्कार, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार, अर्जुन अवॉर्ड २०२२ पुरस्कारासाठी नामनिर्देशनाचे प्रस्ताव दि. २० सप्टेंबर २०२२ पर्यंत सादर करावयाचे आहे. यासाठी जिल्ह्यातील इच्छुकांनी नामांकने सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या वर्षीपासून पात्र खेळाडूंनी सदर पुरस्काराकरीता मार्गदर्शक तत्वानुसार अर्जदारांनी स्वत: फक्त ऑनलाईन पोर्टलद्वारे विहित नमुन्यातील अर्ज कोणत्याही विभाग किंवा व्यक्तीच्या शिफारसीशिवाय थेट केंद्र शासनास dbtyas-sports.gov.in या पोर्टल, वेबसाईटवर सादर करावे लागणार आहे. तसेच ऑनलाईन अर्जा करण्याबाबत काही अडचण आल्यास Department of Sports At sectionsp4-moyas@gov.in किंवा 011-23387432 या संपर्क क्रमांकावर कार्यालयीन दिवशी आणि कार्यालयीन वेळेत सकाळी ९ ते सायंकाळी ५.३० पर्यंत संपर्क करावा. तसेच केंद्र शासनाच्या विविध पुरस्काराची सविस्तर माहिती नियमावली व विहित नमुनातील अर्ज yas.nic.in/sports या वेबसाईटवर उपलब्ध आहे.


No comments:
Post a Comment