कल्याण तालुक्यात पावसाचे धूमशान,कल्याण मुरबाड रस्त्याला नाल्याचे स्वरूप, सखल भागात पाणी ?
कल्याण, (संजय कांबळे) : आज सांयकाळी सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे अक्षरशः धुमाकूळ घातला असून यामुळे कल्याण मुरबाड मार्गाला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. अनेक सखल भागात पाणी भरल्याने नागरिकांची चांगलीच पंचायत झाली तर भात पिकांना या पावसाचा फायदा होणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे.
आज सायंकाळी ६:३० नंतर कल्याण ग्रामीण भागात पावसाला जोरदार सुरुवात झाली. वादळी वा-यासह आलेल्या पावसाने सर्वाचीच दाणादाण उडवली, कल्याण मुरबाड मार्गावर टाटा पावर हाऊस, सिक्रेट हार्ट स्कूल, दुर्गानगर, बंजरग हार्ड वेअर, आणि रोज वाईन येथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी भरले होते, या ठिकाणी नाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. तर म्हारळ, वरप, कांबा गावात अनेक सखल भागात पाणी भरले होते. म्हारळपाडा ते पाचवामैल पर्यत रस्त्याचे काम सुरू असल्याने येथे तर नदीसारखे पाणी वाहताना दिसत होते, या पावसामुळे उल्हास, बारवी, काळू आणि भातसा नदीच्या पाण्यात वाढ झाली आहे.
तर या पावसाचा भात पिकांना फायदा होईल असे शेतकऱ्यांनी सांगितले.
एक ते दोन तासात तालुक्यात सर्व दूर असा पाऊस पडला आहे.




No comments:
Post a Comment