भिवंडी, दि.२, (प्रतिनिधी) : भिवंडी तालुक्यातील लाखिवली ग्रामपंचायत हद्दी मधील पालीवली, मानीचा पाडा येथील आदिवासी महिलांना साड्या व शाळेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप कार्यक्रम बालवाडी शाळा मानीचा पाडा येथे रविवारी दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ. किशोर बळीराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
यावेळी मानव सेवा हीच ईश्वर सेवा या ग्रुपचे प्रमुख डॉ.श्री. मनीलाल रतिलाल शिंपी यांच्या नेतृत्वाखाली ग्रुपचे सदस्य डॉ.श्री. यशवंत अनंत म्हात्रे यांच्या सौजन्याने कार्यक्रमाचे आयोजन रंजीता मनोहर मोरे व स्वप्नाली संतोष मोरे यांनी उत्कृष्टरित्या केले होते,
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून समाजसेवक नटवर वर्मा, समाजसेवक रोहिदास भालेराव, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे ग्रुप अध्यक्ष आचार्य सुरज पाल यादव, कोमल समाचारचे संपादक श्रीनिवास सिरीमल्ले, ग्रामपंचायत सदस्य पालीवली वसंत मोरे, टेंभीवली गावचे समाजसेवक प्रणय पाटील, भावेश पाटील, आदी मान्यवर मोठ्या संख्येने महिला व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.
आज आमच्या ग्रुपचे प्रमुख तथा आर एस पी कमांडर डॉ. मणिलाल शिंपी यांच्या खंबीर नेतृत्वामुळे आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात असे उपक्रम राबवत आहोत, कोणताही कार्यक्रम असो आम्ही आमच्या ग्रुपच्या माध्यमातून देवदूत शोधत असतो संपूर्ण महाराष्ट्रात नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे त्यामुळे सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील आम्ही गरीब, गरजू, अंध, अपंग, निराधार महिलांना साड्यांचे वाटप करून त्यांच्या रूपात नवदुर्गाचे दर्शन घेतो त्याप्रमाणे तुमच्या रूपामध्ये आज आम्ही नवदुर्गांचे दर्शन घेऊन समाधानी झालो असे संपादक डॉ. किशोर पाटील यांनी अध्यक्ष भाषणात मनोगत व्यक्त करताना सांगितले. आज खेड्यापाड्यांमध्ये नवरात्रीचा जोगवा सुरू आहे व त्यासाठी आपण सर्व महिला गरबा नृत्य करत असतो, ज्यावेळी नवरात्री ला सुरुवात होते त्याचवेळी नऊ दिवसाच्या रंगांचे फळक झलकले जातात व ते आपण त्या रंगाप्रमाणे साडी लावून साजरा करीत असतो, अशावेळी रंगांची साडी कपाटात ठेवताना कपाटातील साडी खाली पडते अशा साड्या आम्ही आम्हाला द्या असे सांगतो व त्याच साड्या अनेक गरीब गरजूंना वाटून त्यांच्यातिल दुर्गा मातेचे दर्शन आम्ही घेतो, आज या ठिकाणी स्वराज्य तोरण चे संपादक तथा स्वराज्य तोरण चारिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉ. किशोर पाटील यांच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचलो आहे, व त्यासोबतच भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ.यशवंत अनंत म्हात्रे यांच्यासारख्या देवदूतांचे सहकार्य आम्हाला मिळाले, त्यामुळेच असे कार्यक्रम आम्ही सर्व ठिकाणी राबवत असतो असे मत डॉ. मनीलाल शिंपी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, कोरोना काळाच्या दोन वर्षात विविध समस्यांना सामोरे जात असताना आम्हाला दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक डॉ. किशोर पाटील व मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा या ग्रुपचे प्रमुख डॉ. मनीलाल शिंपी यांच्याशी संपर्क झाला त्यांच्या माध्यमातून मला तुमची सेवा करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य समजतो असे यावेळी डॉ. यशवंत म्हात्रे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आचार्य सुरज पाल यादव यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य वसंत मोरे ,प्रणय पाटील, भावेश पाटील, रंजीता मोरे, स्वप्नाली मोरे यांनी विशेष मेहनत घेतली.
No comments:
Post a Comment