Sunday, 2 October 2022

*डॉक्टर जयपालसिंह मुंडा यांचे स्मरण* करून धडगाव.. तालुक्यात आदिवासी महासभा !

*डॉक्टर जयपालसिंह मुंडा यांचे स्मरण* करून धडगाव.. तालुक्यात आदिवासी महासभा ! 

"स्थापन.. प्रमुखपदी रामसिंग पावरा"


चोपडा, बातमीदार.. नंदुरबार जिल्हातील धडगाव तालुक्यातील धनाजे बु !! गावी डुमटी पाडा येथे आदिवासी कार्यकर्ते कॉम्रेड रामसिंग पावरा यांचे पुढाकारातून बैठक घेण्यात आली. या बैठकीला आदिवासी महासभेचे राज्य उपाध्यक्ष कॉ. अमृत महाजन जळगाव व भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे नंदूरबार जिल्हा सचिव व जिल्हा परिषदचे माजी सदस्य कॉम्रेड ईश्वर पाटील. व कॉम्रेड राम पावरा धुळे यांनी मार्गदर्शन केले. 


त्यावेळी आदिवासीं महासभेचे संस्थापक दिवंगत डॉ. जयपालसिंह मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यावेळी डॉक्टर जयपालसिंह मुंडा यांच्या कार्याची कॉम्रेड महाजन यांनी माहिती दिली. व त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन आदिवासींनी कार्य करावे. आदिवासी महासभा चालवावी असे आवाहन केले. कॉम्रेड ईश्वर पाटील म्हणाले की, जळगाव धुळे नंदूरबार जिल्ह्यात 1969 ते 1975 व नंतरच्या काळात जबरान ज्योत कास्तकार आंदोलनामुळे. त्यात अनेकदा पाठपुरावा केल्याने त्यातच 2004 साली जनतेने डाव्या पक्षांचे लोकसभेत 54 निवडून दिले. त्यांच्या पुढाकारातून आदिवासींना जमिनी देण्यासाठी वन अधिकार कायदा 2006 अस्तित्वात आला. ही वस्तुस्थिती जाणून घ्यावी. व आदिवासी महासभा मजबूत करावी असे आवाहन केले. 


त्यानंतर धडगाव तालुका आदिवासी महासभा ची स्थापना करण्यात आली महासभेचे तालुका प्रमुख संघटक म्हणून कॉ. रामसिंग चंद्रसिंग पावरा यांची निवड करण्यात आली. धडगाव तालुक्यातील आदिवासींच्या एकजूटीवर भर देऊन त्यांचेसाठी लढणाऱ्या संघटना व एनजीओ यांच्याशी बंधुभाव ठेवून आदिवासी महासभेचे कामकाज करावे, असे ठरले. बिलगाव ते सावऱ्यादीगरला जोडणारा उदय नदीवरील पूल बांधकाम दिवाळीनंतर ताबडतोब सुरू करा या मुद्द्यावर जळगाव नंदुरबार जिल्हा तालुका प्रशासन यांना निवेदन देण्याचे ठरले तसेच डूमटी पाडा, स्थानिक पाडा/ वस्ती यांना जोडणारे अंतर्गत रस्ते ग्रामपंचायतने मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत पूर्ण करावे. डूमटी पाडा वस्ती अंतर्गत स्ट्रीट लाइट पोल उभे करा.


शासनाच्या कृषी योजनेच्या आदिवासींना लाभ मिळावा या मागण्यांवर पाठपुरावा करण्याचे ठरले . मानसिंग पावरा, आकाश फोपऱ्या पावरा, योतिन पावरा, भाईदास पावरा चंद्रसिंग पावरा तेजस पावरा मनीबाई पावरा प्रल्हाद पावरा तेरसिंग पावरा. आदींची बैठकीला उपस्थित होती.

No comments:

Post a Comment

वी नीड यू सोसायटीचे २०२४चे शिक्षण, समाज व कार्यव्रती पुरस्कार जाहीर !!

वी नीड यू सोसायटीचे २०२४चे शिक्षण, समाज व कार्यव्रती पुरस्कार जाहीर !! ठाणे, प्रतिनिधी : वी नीड यू सोसायटी संस्थेतर्फे समाजात ‘व...