Saturday, 1 October 2022

समेळपाडा कॉंग्रेस अध्यक्षा रुचिता अमित नाईक यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश !! "आयुक्तांकडुन कारवाई"

समेळपाडा कॉंग्रेस अध्यक्षा रुचिता अमित नाईक यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश !!  "आयुक्तांकडुन कारवाई"  

*नालासोपारा (प.) मधिल रेल्वे स्टेशनला जाणारा रस्ता अनधिकृत फेरीवाले व दुकानदार यांच्या अतिक्रमणामुुळे होता अरूंद"


वसई, प्रतिनिधी : नालासोपारा (प) मधिल सत्यम शिवम शॉपिंग सेंटर व सोनल शॉपिंग सेंटर मधिल रेल्वे स्टेशन ला जाणाऱ्या रस्त्यावर अनधिकृत फेरीवाले व दुकानदारांनी रस्त्यावर दुकान वाढवून रस्ता अरुंद केल्याने नागरीकांना जाण्यायेण्यास ही रस्ता राहिला नाही महापालिका दरवेळेस धातुर मातुर कारवाई करून दिखाऊपणा करण्याचे काम करत असे.


या रस्त्यावरील होणारा त्रास कायमचा सोडवून रस्त्ता मोकळा करावा अशी मागणी नागरीकांनी माझ्याकडे केली असुन याचा नाहक त्रास प्रवास करून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांना करावा लागत आहे, अनधिकृत फेरीवाल्यांबाबत योग्य नियोजन करत त्यांना स्थलांतरीत करण्यात यावे. 


या रस्त्यावर ज्या अनधिकृत फेरीवाले व दुकानदारांनी अतिक्रमण करून रस्ता अरूंद केला आहे व रेल्वे प्रवासी व नागरीकांना त्रास देण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर तातडीने दंडात्मक कारवाई करून फौजदारी गुन्हे नोंद करावी.  


तसेच या रस्त्यावर "ना- फेरीवाला क्षेत्र" घोषित करण्यात यावे अशी मागणी *रुचिता नाईक* यांनी महापालिका आयुक्तांकडे १ ऑगस्ट २०२२ तक्रार केली होती, आयुक्तांनी याची दखल घेत कारवाई केली....

No comments:

Post a Comment

निळजे गाव येथे आई एकवीरा देवी पदयात्रा पालखी सोहळा मोठया भक्तिमय वातावरणात संपन्न ! ** ह. भ. प. श्री जितेन्द्र महाराज पाटील यांच्या कीर्तनान...