औरंगाबाद (लासुर स्टेशन), अखलाख देशमुख, दि १ ऑक्टो. : पांडव लॉन्स, ता. गंगापूर येथे भारतीय जनता पार्टी आयोजित लाभार्थी संवाद संमेलनाला केंद्रीयमंत्री भूपेंद्र यादव यांच्या लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत लासूर स्टेशन येथे केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सहकार मंत्री अतुल सावे, आमदार प्रशांत बंब यांनी यावेळी उपस्थित राहून लाभार्थ्यांशी संवाद साधला व योजनांच्या अंमलबजावणी बाबत त्यांचा अभिप्राय घेतला.
तसेच प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर, सयांनमंत्री संजय कोडगे, प्रदेश सचिव इद्रिस मुलतानी, प्रदेश सचिव प्रवीण घुगे जिल्हा, अध्यक्ष विजय औताडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड, तालुका अध्यक्ष शिवनाथ मालकर, जिल्हा सरचिटणीस किशोरजी धनायात, तालुका अध्यक्ष प्रकाशजी वाकळे, माजी सभापती गणेश नाना आधाने, जिल्हा उपाध्यक्ष संजय खंबायते, जिल्हा सचिव प्रा. संजय गव्हाणे, नगराध्यक्ष प्रदीप पाटील, जिल्हा सरचिटणीस लक्ष्मणराव आवटे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment