कल्याण, संदीप शेंडगे : मानव सेवा हीच ईश्वर सेवा या ग्रुपचे प्रमुख डॉ. मनिलाल शिंपी यांच्या नेतृत्वाखाली दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ. किशोर पाटील, स्वामीनारायण ट्रस्टचे संचालक डॉ. दिनेश भाई ठक्कर, समाजसेवक डॉ. रामचंद्र देसले, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण तरे, लेडीज एक्सप्रेसच्या मधुबेन ठक्कर, वर्षा बाविस्कर, ज्योती पुजारा, यांच्या सहकार्याने मोहने आंबिवली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक उद्यान येथे आज २०० गरजू महिलांना साडी वाटप करण्यात आले.
नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून वीट भट्टी कामगार, ऊसतोड कामगार, बिगारी कामगार अंध अपंग अशा गरीब गरजू महिलांना साडीचोळी देऊन खऱ्या अर्थाने दुर्गा पूजन करण्याच्या मानस मानव सेवा ग्रुप मार्फत अमलात आणला जात आहे. आतापर्यंत ३५०० (साडेतीन हजार) गरजू आणि मेहनती महीला नवदुर्गांना साडीचोळी देऊन महिलांचा सन्मान करण्यात आला.
तसेच डॉक्टर मनीलाल शिंपी आणि त्यांच्या सहकारी टीम कडून आदिवासी पाड्यात शनिवारी महिलांना साडी वाटप करून दुर्गा पूजन आयोजित केले आहे व सोमवारी अष्टमी नवदुर्गा मातेचा महोत्सव निमित्त अंधअपंग अशा महिलांना साडी दुर्गा पूजन करायचे आहे.
समाजातील दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने केलेल्या मदतीमुळे आम्हाला सेवा करण्याची संधी मिळत आहे. त्याबद्दल या सर्वांचे मनिलाल शिंपी यांनी आभार व्यक्त केले. आजचा संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन अक्षरा विकास सामजिक संघटनेचे अधक्षा कल्पना पायाळ, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे वार्ड क्रमांक १२ चे अध्यक्ष आनंद सोनवणे, कल्याण नागरिकचे कार्यकारी संपादक संदीप शेंडगे यांनी केले होते. नुसरत सिद्धी, शिला लव्हे रेखा झेंडे, यासह मोहोने परिसरातील अनेक महिलांनी या कार्यक्रमात हजेरी लावली.
No comments:
Post a Comment