Saturday, 1 October 2022

ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात प्रथमच हृदय प्रत्यरोपणाची यशस्वी शस्रक्रिया , कोकणातल्या एसटी कर्मचाऱ्याला जीवदान !!

ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात प्रथमच हृदय प्रत्यरोपणाची यशस्वी शस्रक्रिया , कोकणातल्या एसटी कर्मचाऱ्याला जीवदान !!


भिवंडी, दिं २, अरुण पाटील (कोपर) :
         ठाण्यातील हृदय प्रत्यारोपणाची पहिलीच शस्त्रक्रिया ज्युपीटर रुग्णालयातील डॉक्टरांनी यशस्वी करून दाखवली असून कोकणातील ३९ वर्षीय एसटी कर्मचाऱ्याला चक्क दुसरे हृदय लावण्याची किमया केल्याने जीवदान मिळाले आहे. अशी माहिती ज्युपीटर रुग्णालयाचे डॉक्टर नितिन बुरकुले यांनी दिली आहे.
          ही अवघड शस्त्रक्रिया डॉ. प्रविण कुलकर्णी, डॉ. सौम्य शेखर यांच्या मार्गदर्शनाखाली ८ वरील हृदयरोग तज्ज्ञांनी पार पडल्याचे रुग्णालयाच्या सीईओ डॉ. शिल्पा ताटके यांनी सांगितले. दरम्यान, कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भिकाजी निर्गुण हे रुग्ण एसटी कर्मचारी असून जीवदान दिल्याबद्दल त्यांनी तसेच त्यांच्या कुटुंबियांनी ज्युपिटर रुग्णालयातील डॉक्टरांचे आभार मानले आहेत.
          सविस्तर हकीगत अशी की,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील नेरुर, माड्याची वाडी येथे भिकाजी हे पत्नी समिक्षा व दोन मुलांसह राहतात. गेली १२ वर्षे ते एसटी महामंडळाच्या वेंगुर्ला आगारात यांत्रिक विभागात नोकरीला आहेत. ३ जुलैला शेतात काम करत असताना त्यांना अचानक हृदविकाराचा तीव्र झटका आला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना जवळच्या एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. त्या रुग्णालयात प्रचंड खर्च लागेल म्हणून कुटुंबिय हादरले. नंतर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात ३ ऑगस्टला दाखल करण्यात आले होते.
           नंतर २४ ऑगस्टला मध्यरात्री ४ वाचता त्यांच्यावर हृदय प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. सरकारच्या विभागीय समितीमार्फत मुंबईच्या नानावटी रुग्णालयातील ५९ वर्षीय रुग्णाचे हृदय उपलब्ध झाले. त्यांनतर मुंबई आणि ठाणे पोलिसांच्या मदतीने ग्रीन कॉरिडॉर तयार करुन अवघ्या ३५ मिनीटांत हृदय ठाण्यात आणण्यात आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. ही ठाण्यातील पहिलीच हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली.
         या शस्त्रक्रियेसाठी कोकणातील गावकऱ्यांनी आणि काही ट्रस्टच्या साह्याने जवळपास ४० ते ५० लाख जमा झाले आणि शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने रुग्ण व त्याच्या कुटुंबियांनी ज्युपिटर रुग्णालयातील सर्व डॉक्टरांचे आभार मानले आहे .
          भिकाजी निर्गुण यांना ज्युपीटर रुग्णालयात दाखल केले तेव्हा त्यांची प्रकृती अतिशय गंभीर होती. शस्त्रक्रिया खर्चिक तसेच अवघड होती. पण, रुग्णसेवेला प्राधान्य देत हृदय मिळाल्यानंतर चार तासातच ही शस्त्रक्रिया यशस्वीरिच्या पार पडली. सुदैवाने मुंबईतच हृदय उपलब्ध झाल्याने गोल्डन अवरमध्ये प्रत्यारोपण उत्तमरित्या होऊ शकले. या कठीण अशा शस्त्रक्रियेत ज्युपिटरचे सर्व डॉक्टर, कर्मचारी तसेच अत्याधुनिक यंत्रसामुग्री यांचे योगदान मोलाचे ठरले.

No comments:

Post a Comment

वी नीड यू सोसायटीचे २०२४चे शिक्षण, समाज व कार्यव्रती पुरस्कार जाहीर !!

वी नीड यू सोसायटीचे २०२४चे शिक्षण, समाज व कार्यव्रती पुरस्कार जाहीर !! ठाणे, प्रतिनिधी : वी नीड यू सोसायटी संस्थेतर्फे समाजात ‘व...