Thursday, 27 October 2022

कल्याण तालुक्यातील दहिवली आडिवली ग्रामपंचायतीवर ठाकरे गटाची बाजी, उपसरपंच पदी कु. दर्शन मलिक !

कल्याण तालुक्यातील दहिवली आडिवली ग्रामपंचायतीवर ठाकरे गटाची बाजी, उपसरपंच पदी कु. दर्शन मलिक !


कल्याण, (संजय कांबळे) : काळू नदीच्या काठावर आणि घनदाट अशा वनराईत लपलेल्या दहिवली आडिवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी ठाकरे गटाचे कु. दर्शन केशव मलिक याची बिनविरोध निवड झाली, त्यामुळे कल्याण तालुका मशालीच्या उजेडात उजळून निघणार असे चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे.


कल्याण तालुक्यातील दहिवली आडिवली या ग्रुप ग्रामपंचायतीचे एकूण ८ सदस्य आहेत, यापैकी सरपंच पदी कमलाकर दामोदर राऊत याचा विजय झाला होता उर्वरित ७ सदस्या मधील २ सदस्यांचे जात पडताळणी न झाल्याने ते रिक्त झाले, त्यामुळे राहिलेल्या ५ सदस्यांमध्ये उपसरपंच पदाची निवडणूक आज होती, यामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गठाचे कु. दर्शन केशव मलिक यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी शाखा अभियंता गगे यांनी कु. दर्शन मलिक याची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.यावेळी ग्रामसेवक प्रविण शेलवले उपस्थित होते. विशेष म्हणजे सरपंच  व उपसरपंच हे दोघेही समवयस्क आहेत,


शिवसेनेशी गद्दारी करून ४० आमदार फुटून गेले तरीही कल्याण तालुका मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला, तालुका वरीष्ठ पदाधिकारी शिंदे गटात गेले असले तरी शिवसैनिक आजही ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे ग्रामपंचायत निवडणुकीत दाखवून दिले. कल्याण तालुका हा मशालीच्या उजेडात उजळून निघाला आहे. भविष्यात देखील आमदार, खासदार निवडणुकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना साथ देणार असल्याचे शिवसैनिक व निवडून आलेल्या सदस्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...