औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि २७ : सिल्लोड तालुक्यातील बोरगाव कासारी येथे गावकऱ्यांच्या वतीने कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेब यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे तसेच कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत बाळासाहेबांची शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. दिवंगत बाळासाहेब ठाकरे , आनंद दिघे यांचे विचार व मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी घेतलेले जनहितार्थ निर्णय घराघरात पोहचवून लाभार्थ्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून द्या असे आवाहन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना केले.
यावेळी बाळासाहेबांची शिवसेनेचे तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, जि.प. माजी अध्यक्ष श्रीराम पा. महाजन, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, न.प.तील बाळासाहेबांची शिवसेनेचे गटनेते नंदकिशोर सहारे, दामूअण्णा गव्हाणे, राजेंद्र ठोंबरे, विश्वास दाभाडे, सतीश ताठे, नगरसेवक राजू गौर , युवासेना अक्षय मगर, नाना कळम, पांडुरंग जैवळ, हनिफ मुलतानी, जमीर मुलतानी, परमेश्वर जीवरग यांच्यासह बोरगाव कासारी येथील सुखदेवरराव जाधव, माजी सरपंच ज्ञानेश्वर जाधव, बाळू पा. मोठे, सुभाष जाधव, काशीनाथ पा. ईधाटे, देविदास गोराडे, नारायण काशिनाथ जाधव, बबन देवरे , विठ्ठल नाना जाधव, राजू ब्राम्हणे, अजिनाथ जाधव आदींची उपस्थिती होती.
*यांनी केला बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश*
काशिनाथ पाटील विधाटे माजी चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी तलवाडा बोरगाव, बाळू पाटील मोठे माजी सरपंच बोरगाव कासारी, नामदेवरावजी गोराडे ,शिवाजी राजाराम मोठे, बाजीराव मोठे मारोती वाडेकर, रामेश्वर पुंडलिक जाधव, सुखदेव दगडू वाडेकर, रामचंद्र धनाजी ब्राह्मणे, प्रकाश सखाराम ब्राह्मणे विठ्ठल गोदाजी ब्राह्मणे, संतोष बाबुराव मोठे, द्वारकादास किसन जाधव, गहेणाजी सांडू साबळे, नारायण बाळू मोठे, रामेश्वर विनायक जाधव, दीपक छगन कांबळे, पंडित गोदाजी ब्राह्मणे, दीपक छगन कांबळे, रतन दशरथ कांबळे, सुखदेव अश्रुबा कांबळे, सुरेश हिरालाल ब्राह्मणे, सुखदेव सांडू वाकेकर यांनी प्रवेश केला.

No comments:
Post a Comment