Thursday, 27 October 2022

देवगिरी महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा ‘नॅक'चा ‘A++’ दर्जा !

देवगिरी महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा
‘नॅक'चा ‘A++’ दर्जा !


औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि २७ : मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालयास राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रत्यायन परिषदच्या (नॅक) तज्ज्ञ समितीने 18 व 19 ऑक्टोबर रोजी भेट देत पाहणी केली होती.

या पाहणीनंतर ‘नॅक’ने नुकतेच गुणांकन जाहीर केले असून त्यात देवगिरी महाविद्यालयास 3.59 गुणांसह ‘A++’ उच्च श्रेणी मिळाली आहे. ही उच्च श्रेणी प्राप्त करणारे देवगिरी महाविद्यालय देशातील दुसरे तर राज्यातील प्रथम क्रमाकांचे महाविद्यालय ठरले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे मन:पूर्वक अभिनंदन... !

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...