मुंबई उपनगर, (शांताराम गुडेकर) :
आंतरराष्ट्रीय मानव अधिकार राजदुत संघटना,माहीती अधिकार,पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना व भारतीय महाक्रांती सेना यांच्या वतीने यशवंतराव चव्हाण नाटयगृह, पुणे येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती,मंडळ, संस्था यांच्यासाठी महाराष्ट्र रत्न (उद्योजक ) राज्यस्तरीय पुरस्कार सन्मान सोहळा- २०२२ सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संस्थापक अंतरराष्ट्रीय अध्यक्ष. डॉ.अविनाश ध.सकुंडे,राष्ट्रीय अध्यक्ष (पो.मि.) कैलासदादा ब.पठारे, पुणे शहर प्रसिद्धी प्रमुख सतिश सिताराम राठोर, अंतरराष्ट्रीय अध्यक्ष (म.आ.) जयश्रीमाई सावर्डेकर आणि पदाधिकारी यांनी आयोजित केला होता.यावेळी सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण, वैद्यकीय कार्यात अग्रेसर असलेल्या मुंबई मधील शिवसेना प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेला आणि सामाजिक कार्यात मदतीचा हात देणारे संस्थापक श्री.यशवंत खोपकर व त्यांच्या सहकाऱ्यांना प्रमुख पाहुण्या मराठीअभिनेत्री झेबा शेख यांच्या शुभहस्ते महाराष्ट्र रत्न पुरस्कार-२०२२ प्रदान करण्यात आला.या कार्यक्रमला प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री चंद्रकांत दादा पाटील (उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्य मंत्री महा.राज्य), मा.श्री.दिपकजी मानकर (मा.महापौर,पुणे), मा.श्री सचिन गवळी शिव व्याख्याते सिने अभिनेते, मराठी अभिनेत्री झेबा शेख आदी मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार स्वीकारताना मायेची सावली एक हात कर्तव्याचाचे संस्थापक श्री. यशवंत खोपकर, कमेटी मेंबर श्री.भरत पंडीत, दिपक चौधरी, संदिप चादिवडे, बंडु चौधरी, विनायक जाधव, राजु पेडणेकर आदी उपस्थित होते. हे दोन पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मायेची सावली एक हात कर्तव्याचाचे संस्थापक श्री.यशवंत खोपकर आणि पदाधिकारी यांना अनेकांकडून अभिनंदनसाह शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
No comments:
Post a Comment