Wednesday, 26 October 2022

शिवप्रभा ट्रस्ट पुणे व माणुसकी समुहाच्या वतीने गरजुंना फराळाचे वाटप !

शिवप्रभा ट्रस्ट पुणे व माणुसकी समुहाच्या वतीने गरजुंना फराळाचे वाटप !

*ज्युनीयर चार्ली च्या मुख अभिनयातुन सुमित पंडित यांनी फुलवले गरीबांच्या चेहऱ्यावर हस्स*


औरंगाबाद, अखलाख देशमुख (सिल्लोड) दि २६ : 
शिवप्रभा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्या सयुक्त विद्यमाने ५१ गरजु घरापर्यंत दिवाळी फराळ वाटप करण्यात आले. माणुसकी रुग्ण सेवा समुहाच्या टिम गरजुंना वाटप करीत आहे, दिवाळी सणात गरीबांच्या आयुष्यात गोडवा वाढावा व त्यांनाही दिवाळी सनाचा आनंद द्विगुणीत व्हावा यासाठी ह्या वंचित गोरगरीबां मधे, फराळ गोडधोड पदार्थ वाटून घरोघरी समाधान वाटो दारोदारी हा उपक्रम राबवत आहे,
त्यांच्या ह्या उपक्रमाचे कौतुक साय्यक पोलिस निरीक्षक सिल्लोड शहर श्रीमती नालंदा लांडगे करतांना म्हणाल्या की दुसऱ्यांच्या आनंदात आनंद मानून औरंगाबाद व सिल्लोड तालूक्यातील वस्ती, वाड्या, तांड्यावर, पोहोचून चार्लीच्या मुक अभिनयातून समाजसेवक सुमित पंडीत यांनी खळखळून हसायला लावून तसेच फराळ वाटप करुन गरीबांच्या आनंदात भर टाकणाऱ्या उपक्रमाच्या प्रशंसेस शब्द देखील अपुरे पडतात. त्यांनी ह्या वेळी दिवाळी सणाच्या उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. दिवाळी फराळ वाटप उपक्रमाचे समाजातील सर्व स्तरातून कौतूक होत आहे. ह्या प्रसंगी नालंदा लांडगे मॅडम सिल्लोड शहर पो स्टेशन, मुक्ताराम पा.गव्हाणे स्वा. शे.संघटना, कचरु सुरडकर, पिराजी वराडे, सुनिल शिंदे, पुरन सनान्से, अर्जुन सौंदर,शराम पंडित, समाजसेविका सौ. पुजा पंडितलक्ष्मी पंडित,शज्युनीयर चार्ली समाजसेवक सुमित पंडित हे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...