वरप गावाच्या डॉ. अक्षय प्रकाश गोंधळे यांचे आकस्मिक निधन, गावावर शोककळा, अंत्ययात्रेस उसळला जनसागर !
कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण पंचायत समितीचे उपसभापती भरत गोंधळे यांचे चुलतभाऊ आणि वरप गावच्या माझी सरपंच सौ. राजश्री प्रकाश गोंधळे यांचा सुपूत्र डॉ. अक्षय प्रकाश गोंधळे यांचे आज अचानक आकस्मिक निधन झाले, अत्यंत गुणी, शांत, आणि हुशार अश्या अक्षयच्या जाण्याने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली असून त्यांच्या अंत्ययात्रेला तालुक्यातून जनसागर उसळला होता. यावेळी प्रत्येक जण हळहळ व्यक्त करत होते.
तालुक्यातील वरप गाव हे कल्याण मुरबाड मार्गाने वसलेले आहे, या गावातील गोंधळे परिवार मोठा परिवार आहे, याच परिवारातील भरत गजानन गोंधळे, सौ. राजश्री प्रकाश गोंधळे यांनी वरप ग्रामपंचायतीवर सरपंच म्हणून कारभार केला आहे. या कुंटूबातील बहुतांश सदस्य हे राजकारणात असले तरी याला प्रकाश गोंधळे हे अपवाद ठरले, ते स्वतः शिक्षक असल्याने त्यांनी मुलगा अक्षय यास डॉक्टर करण्याचे स्वप्न पाहिले होते, आणि अक्षयने ते पुर्णत्वास नेले ही, अत्यंत हुशार, गुणी, आज्ञाधारक, इतरांना मानपान देणारा अक्षय या कुंटूबात वेगळाच होता.
त्याने नुकतेच नाशिक (घोटी) येथील एस एम बीटी युनिव्हर्सिटी मधून एमबीबीएस ही वैद्यकीय पदवी प्राप्त केली होती. गावातील कु. श्वेता भगवान भोईर, जागृती गायकर आणि कु. अक्षय प्रकाश गोंधळे हे तीघे डॉक्टर झाले होते. त्यामुळे गावाला यांचा अभिमान वाटत होता.
गावातील गरजवंताना मदत करणारे कुटुंब म्हणून गोंधळे कुटुंबीय ओळखले जातात. याच कुटुबाचे जेष्ठ सदस्य भरत गोंधळे हे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष तर कल्याण पंचायत समितीचे उपसभापती आहेत. अश्या कुंटूबातील डॉ. अक्षय प्रकाश गोंधळे यांचे अवघ्या २७ वर्षी आज सकाळी आकस्मिक निधन झालं, त्याला वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. परंतु नियतीने डाव साधला. हा हा म्हणता ही वार्ता वा-यासारखी संपूर्ण तालुक्यात पसरली, कोणालाही खरे वाटत नव्हतं, अनेकांचा तर विश्वास बसत नव्हता. प्रत्येक जण हळ हळ व्यक्त करत होते. जेव्हा अंगणात त्याचा विधी करण्यात आला तेव्हा तर सगळ्याचा बांध फुटला, डोळ्यातून अश्रू वाहत होते.
यावेळी डॉ. अक्षय यांच्या अंत्ययात्रेत जनसागर उसळला होता. राष्ट्रवादीचे नेते व सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदूराव, उपसभापती भरत गोंधळे यांचे कल्याण पंचायत समितीचे सर्व सहकारी, सेक्रेट हार्ट स्कूलचे व्यवस्थापक अलंबिन सर, राष्ट्रीय सेलचे उपाध्यक्ष संतोष शेलार, तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य, आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
No comments:
Post a Comment