Thursday, 6 October 2022

*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चिपळूण ता. युवक अध्यक्ष पदी प्रणित पवार यांची निवड*

*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चिपळूण ता. युवक अध्यक्ष पदी प्रणित पवार यांची निवड*


मुंबई :- ( दिपक कारकर ) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या राष्ट्रीय पक्षाचा ६६ वा वर्धापन दिन व पक्षातील जेष्ठ कार्सकर्त्यांचा सन्मान सोहळा असा संयुक्त कार्यक्रम सोमवार दि.०३ ऑक्टोबर २०२२ रोजी चिपळूण शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन येथे बहुसंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यातुन युवा आक्रमक नेतृत्व करण्याकरिता मुर्तवडे गावचे सुपुत्र प्रणित अशोक पवार यांची तालुका युवक अध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
        या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष प्रितम रुके, जिल्हा सरचिटणीस आदेश मर्चंडे, माजी आमदार सदानंद चव्हाण, तालुका अध्यक्ष प्रशांत मोहिते, कार्याध्यक्ष संदेश कदम, सरचिटणीस उमेश सकपाळ, उपाध्यक्ष अशोक कांबळे, जिल्हा युवक अध्यक्ष प्रशितोष कदम, शहराध्यक्ष मंगेश जाधव, शहर सरचिटणीस अमोल कदम, जिल्हा संघटक अशोक पवार, ज्येष्ठ मार्गदर्शक सिद्धार्थ पवार, संजय पवार, विलास पवार, सिताराम पवार, मोहन पवार, अशोक गणपत पवार, विजय पवार, सुशील पवार, सागर पवार, यांच्यासह तालुक्यांतील अनेक गावातील मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

कौशल्य, रोजगार, उदयोजकता व नाविन्यता विभागांतर्गत इस्राईल येथे रोजगाराची संधी !!

कौशल्य, रोजगार, उदयोजकता व नाविन्यता विभागांतर्गत इस्राईल येथे रोजगाराची संधी !! **इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन  पुणे,...