Sunday, 2 October 2022

*निवोशीत 'पोलीस पाटील' यांच्या समोरच देण्यात आली जीवे मारण्याची धमकी*

*निवोशीत 'पोलीस पाटील' यांच्या समोरच देण्यात आली जीवे मारण्याची धमकी*


*कोकण / गुहागर : उदय दणदणे*

गावात कायदा सुव्यवस्था व शांतता राखली जावी यासाठी गावागावात संविधानिक प्रक्रियेतून प्रशासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या 'पोलीस पाटील' पदाला फार मोठे महत्त्व प्राप्त आहे किंबहुना गावात शांतता राखणे यात त्यांचे फार मोठे योगदान असते मात्र गुहागर तालुक्यात निवोशी येथे थेट 'पोलीस पाटील' यांच्या समोरच निवोशी येथील शेतकरी अनिल दणदणे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना समोर आली आहे.


अनिल दणदणे हे निवोशी गावचे रहिवासी असून त्यांच्या घराशेजारील जागेत २८ सप्टेंबर २०२२ रोजी लगेतदार जमीन मालक यांचे मुखत्यार मंदार जोगळेकर राहणार पालशेत यांच्याकडून झाडे लावण्या हेतू खड्डे मारण्यात आले असल्याचे अनील दणदणे यांच्या कुटुंबियांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी लगेतदार जमीन मालक यांचे मुखत्यार मंदार जोगळेकर यांना सदर खड्डे हे आमच्या जागेत येत असल्याचे स्पष्ट करून सदर ठिकाणी खड्डे मारू नये करीता विनंती केली. व घडलेला प्रकार गावचे 'पोलीस पाटील' यांच्या निदर्शनास आणून सदर घटनास्थळाची आपण पाहणी करून आमच्या कायम झालेल्या हद्दीत सदर लगेतदार जमीन मालकाचे मुखत्यार यांनी आम्हाला त्रासदायक ठरतील असे कोणतेही कृत्य करू नये, बाबत त्यांना समज देण्यात यावी अशी विनंती केली. त्या अनुसरून निवोशी गावचे 'पोलीस पाटील' सदर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी घटनास्थळी आले असता 'पोलीस पाटील' यांच्या समोरच मंदार जोगळेकर राहणार पालशेत यांनी निवोशी येथील शेतकरी अनिल दणदणे यांना दमदाटी करत तुला दोन दिवसात खलास करीन, तुला रगडवायला कमी करणार नाही, तुझ्या दादासला पण सांग अशा प्रकारे अवाच्य भाषेत जीवे मारण्याची धमकी दिली. सदर घटनेबाबत शेतकरी अनिल दणदणे राहणार निवोशी यांच्याकडून दिनांक २९ सप्टेंबर २०२२ रोजी पोलीस पाटील तर ०१ ऑक्टोबर २०२२ रोजी गुहागर वरीष्ठ पोलीस निरीक्षक ता.गुहागर यांच्याकडे सदर घटनेची रीतसर तक्रार करण्यात आली आहे.सदर प्रसंगी देण्यात आलेली धमकी नक्कीच अनिल दणदणे आणि कुटुंबियाला मानसिक धक्का देणारी आहेच परंतु गावच्या कायदा सुव्यवस्था प्रति प्रशासकीय सेवेत पोलीस पाटील पदावर कार्यरत असणाऱ्या पोलीस पाटील यांच्या समोरच एखादी व्यक्ती अशी जीवे मारण्याची धमकी देत असेल तर मग ती कोणतीही व्यक्ती असो समाजात अशा मानसिकतेत वावरणाऱ्या लोकांना वेळीच आवरणे आता गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment

टिटवाळा येथे सिद्धिविनायक मंदिरात भाविकांसाठी मोफत अन्नछत्र सुरू‌ !

टिटवाळा येथे सिद्धिविनायक मंदिरात भाविकांसाठी मोफत अन्नछत्र सुरू‌ ! *शिवसेना उपशहर प्रमुख विजय देशेकर यांचा स्तुत्य उपक्रम* टिटव...