Sunday 27 November 2022

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाचा ज्ञानेश्वर म्हात्रे यांना जाहीर पाठिंबा !

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाचा ज्ञानेश्वर म्हात्रे यांना जाहीर पाठिंबा !

पालघर,: दि.२७ ( ऑनलाईन वृत्तसेवा) : कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना  महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाने जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. 
     ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ज्ञानेश्वर म्हात्रे सरांच्या निवडणूक प्रचारात सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रा. सुनील डिसले, कार्याध्यक्ष प्रा. संपतराव गर्जे, प्रा. बाळासाहेब माने व ठाणे जिल्हा सचिव प्रा. मंजिरी गजरे, प्रा. सुषमा जगदाळे, जिल्हा/विभागीय प्रतिनिधी प्रा. भास्कर मयेकर, प्रा. संजय पाटील, प्रा. महादेव इरकर, प्रा. भाग्यदेवी चौगले व प्रा. भाऊसाहेब महाडदेव यांनी केले आहे.
     कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे हे अनुदानित, विनाअनुदानित, अंशतः अनुदानित कोणत्याही माध्यमाची शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालय असो, त्यांच्या सर्व प्रकारच्या शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी तसेच शिक्षक बंधु-भगिनींच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी सदैव तत्पर असतात. त्यांचे सहकार्य, अथक व अविरतपणे शिक्षकांची सेवा करण्याचा ज्यांनी मनापासून घेतला आहे वसा व अहोरात्र शिक्षकांसाठी झटत राहण्यात ज्यांना मनापासून आनंद वाटतो असे ज्ञानेश्वर म्हात्रे सरच शिक्षकांचे आमदार झाले पाहिजेत यासाठी सर्वांनी मिळून प्रण करण्याचा निर्धार ही यावेळी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाने केला.

No comments:

Post a Comment

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !!

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !! चोपडा, प्रतिनिधी.. महाराष्ट्रात लोकसभेच्या नि...