Sunday, 27 November 2022

माणकोली ते मोठागाव जोडरस्ता लवकरच सुरू होणार, वाहतूक कोंडीतून होणार सुटका !

माणकोली ते मोठागाव जोडरस्ता लवकरच सुरू होणार, वाहतूक कोंडीतून होणार सुटका !

             मोठागव - मानकोली पुल होणार रहदारीस खुला

भिवंडी, दीं,२७, अरुण पाटील (कोपर) :
        माणकोली ते मोठागाव यांना जोडणारा पूलाचे काम लवकरच  पूर्ण होणार आहे, त्यामुळे आता या परिसरातील  वाहतूकदरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. या प्रकल्पात जलवाहतूक आणि मासेमारी होड्या यांना गैरसोय होऊ नये यासाठी पुलाच्या खांबांमधील अंतर आणि उंची योग्य प्रमाणात राखण्यात आलेली आहे
        ठाणे जिल्ह्यातील उल्हास खाडी (नदी) वर उभारण्यात येणाऱ्या पुलाच्या स्पॅनचे काम ७६.५८ टक्के पूर्ण झाले आहे. प्रकल्पातील हा आव्हानात्मक भाग असल्यामुळे, हा भाग पूर्ण झाल्यावर प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा टप्पा पूर्ण होणार आहे.
          कल्याण-डोंबिवली वरून ठाणे-मुंबई दरम्यानचा प्रवास सुसह्य करण्याच्या दृष्टीने एमएमआरडीए मार्फत बांधण्यात येणाऱ्या, १.३ किमी लांबीच्या माणकोली ते मोठागाव जोडरस्ता प्रकल्पात मानकोली पोहोच रस्त्याचे काम प्रगतीथावर असून मोटागाव पोहोच रस्त्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
         या प्रकल्पामुळे मुंब्रा, शिळफाटा, कळंबोली आणि पनवेल या क्षेत्रात प्रवेश न करता मुंबईच्या दिशेने थेट प्रवास करता येईल. त्यामुळे कल्याण डोंबिवली वरून ठाणे - मुंबई दरम्यान वाहतुकीच्या वेळेत सुमारे ३० ते ३५ मिनिटांची बचत होणार आहे. सद्यस्थितीत प्रकल्पाने ८२.०५ टक्के प्रगती केली आहे.
         आम्ही आगरी - कोळी सातत्याने समुद्रात उभे राहणाऱ्या प्रकल्पाच्या संदर्भात ओरड करत होतो की, ब्रिजची उंची आणि दोन पिलर खांबा मधील अंतर हे व्यवस्थित असले पाहिजे अन्यथा त्यामुळे धोका उत्पन्न होतो. जेणेकरून मासेमारी करणाऱ्या बोटी यांना त्याचा अडथळा होऊ नये व विना अडथळा मासेमारी करता यावी ही सूचना आम्ही अनेक वर्षापासून शासनाला सांगत होतो.
            वांद्रे वरळी सी लिंक समुद्रामध्ये पूल बांधताना दोन पिलर मधील अंतर किती असावे ? व कसे असावे या बाबत आम्ही शासनाला सूचना केल्या होत्या. त्या वेळेला शासनाने ऐकले नाही. त्यामुळे बऱ्याचदा समुद्रामध्ये मासेमारी करणाऱ्या बोटी ये-जा करत असतात तेव्हा त्या बोटी या पिलरवर जाऊन आदळतात, सोसाट्याचा वारा - तुफान या मुळे बोटी या पिलर वर जाऊन आदळतात.
        पुढे ते नमूद करतात की, यामुळे आर्थिक नुकसान होते, जीवित हानी देखील होते. मात्र मानकोली ते मोठा गाव जलवाहतूक प्रकल्पा दरम्यान या चुका शासनाने टाळलेल्या आहेत. त्याबद्दल त्याचे स्वागतच आहे, परंतु मच्छीमारांवर संकट उडवणारे कोस्टल रोड प्रकल्प असेल वांद्रे वरळी श्री लिंक असेल ट्रान्सफर लिंक प्रकल्प असेल असे अनेक प्रकल्प राबवतांना मासेमारी करणाऱ्या आगरी कोळी जनतेचे हित शासनाने त्यामध्ये पाहिले पाहिजे.
             या प्रकल्पांसाठी समुद्रामध्ये मोठ्या पद्धतीने ड्रिलिंग केल्या जात मोठ्या पद्धतीने पिलर उभारण्यासाठी खोलवर जाऊन जमीन खुदाई केली जाते त्यामुळे मासेमारी साठी मासे उपलब्ध होत नाही कारण जे मासे खाजण जागेमध्ये येत असतात तसेच या जागेत प्रजनन करत असतात ती जागाच यामुळे नष्ट होते त्यामुळे शासनाने याचा देखील विचार करायला हवा.असे आगरी - कोळी समाजाचे मत आहे.

No comments:

Post a Comment

म्हाडा व सिडकोच्या गृहनिर्माण योजनेत गुणवंत कामगारांनाही आरक्षण देण्यात यावे !!

म्हाडा व सिडकोच्या गृहनिर्माण योजनेत गुणवंत कामगारांनाही आरक्षण देण्यात यावे !! *** राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे मुंबई जिल्हाध्यक्ष  प्रभा...