Saturday, 26 November 2022

सिल्लोड_येथे 26 / 11 दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना वाहण्यात आली आदरांजली !

सिल्लोड_येथे 26 / 11 दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना वाहण्यात आली आदरांजली !

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि २६ : सिल्लोड येथे मुंबई येथील २६ /११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांच्या स्मृतींना उजाळा देत मेणबत्ती प्रज्वलित करून आदरांजली वाहण्यात आली . बाळासाहेबांची शिवसेना - युवासेनेच्या वतीने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात या श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
 
यावेळी युवानेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, नगराध्यक्षा श्रीमती राजश्री निकम, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा.गाढे, पोलीस निरीक्षक अशोक मुद्दीराज, ग्रामीण पोलीस स्टेशनचे एपीआय सीताराम म्हेत्रे, बाळासाहेबांची शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, नॅशनल सुत गिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, सतीश ताठे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दुर्गेश जैस्वाल, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, शंकरराव खांडवे, सत्तार हुसेन, प्रशांत क्षीरसागर, शेख सलीम हुसेन, बबलू पठाण, महिला आघाडीच्या वर्षा पारखे, आशा कांबळे, राधिका साळवे, सावित्री सुरडकर, करुणा सुरडकर, अल्का बोराडे,मानसिंग राजपूत, पंजाबराव चव्हाण, सचिन पाखरे, दीपकसेट अग्रवाल,गौरव सहारे, फहिम पठाण, शिवा टोम्पे, आशिष कटारिया, आनंदा दुधे, संदीप पाटील,संजय शिंदे, गणेश शेलार, गणेश चंदनसे, प्रताप बदर, संतोष देशमुख, सुनील गव्हाणे आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...