Saturday, 26 November 2022

ठाण्यात गुन्हे शाखा, युनिट -१ ने, दोघांकडून केले आमली पदार्थ व जिवंत काडतूस जप्त !

ठाण्यात गुन्हे शाखा, युनिट -१ ने, दोघांकडून केले आमली पदार्थ व जिवंत काडतूस जप्त !

भिवंडी, दिं,२६, अरुण पाटील (कोपर) :
         ठाण्यातील - मुंब्रा वाय जंक्शनवर  अंमली पदार्थ (एमडी पावडर) विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाण्यातील  गुन्हे शाखा (क्राईम ब्रँच) युनिट-१ ला मिळाली असता  गोपनीय माहितीच्या आधारावर शुक्रवारी दुपारी पोलीस पथकाने दोघा आरोपींना सापळा रचून अटक करून त्यांच्याकडून ४ लाख २३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. यात १०७ ग्रॅम  आमली पदार्थ (एमडी  पावडर), १ अग्निशस्त्र आणि ९ जिवंत काडतुसे आणि ३ चॉपर असा मुद्देमाल जप्त केला आहे .
        शुक्रवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास मुंब्रा वाय जंक्शन  ठाणे - मुंब्रा येथे गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने सापळा रचला. खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून सावजाची पोलीस पथक वाट पाहत होते. काही वेळातच वाय जंक्शन उड्डाण पुलाच्या खाली, मुंबा शिळफाटा रोड, मुंब्रा, ठाणे येथे आरोपी अभिषेक कुमार गुप्तेश्वर महतो,( वय ३२, रा. रूम नंबर २, ओम साई लिला चाळ), विष्णु पाटील (नगर टाटा पॉवर रोड, साबे गांव, दिवा पुर्व, ठाणे),  विजय बहादुर मडे, (२० रा. गणराज पॅलेस, ए विंग, रूम नं. ४०८, एन आर नगर, दिवा (पश्चिम) ता जि. ठाणे ),येथे  दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाने दोघा  आरोपींना अटक  केली.
      त्यांची झडती घेतल्यानंतर त्यांच्याकडे ३ लाख २१ हजाराचे १०७ ग्रॅम एमडी, अंमली पदार्थ सापडला. तर सोबत एक अग्निशस्त्र, ९ जीवंत काडतूस आणि १ चॉपर असा ४ लाख २१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी आरोपी अभिषेक कुमार महंतो याच्या घराची झडती घेतल्यानंतर दोन चॉपर आढळले. या दोन्ही आरोपीच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात बेकायदेशीर अंमली पदार्थ बाळगणे, प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
       अटक केलेल्या आरोपींपैकी अभिषेक कुमार महंतो हा यापूर्वी भादंवि ३०७ सारख्या गंभीर गुन्ह्यात सहभागी होता. तर न्यायालयाने त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न प्रकरणी गुन्ह्यात शिक्षा झाली होती. शिक्षा भोगून अभिषेक बाहेर पडला होता. पुन्हा गुन्हेगारी कारवायात सहभागी झाल्याची माहिती पोलिसांनी  दिली आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...