Saturday, 26 November 2022

द. ग. तटकरे महाविद्यालय माणगाव रायगड येथे संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा...

द. ग. तटकरे महाविद्यालय माणगाव रायगड येथे संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा... 

      बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) : माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे द. ग. तटकरे विद्यालय माणगाव रायगड येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आयोजित भारतीय संविधान दिवस २६ नोव्हेंबर २०२२ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. या संविधान दिवसाचे औचित्य साधून सर्वप्रथम भारतीय संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित विद्यार्थिनी कु. दिव्या शिंदे कु. संस्कृती मोहिते. कु. सिद्धी जाधव. कु. मीनल कदम यांनी संविधानविषयी माहिती दिली. त्याचबरोबर संविधानाविषयी घोषवाक्य, कविता, सादर केली. कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख व्याख्याते व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र आचार्य यांनी भारतीय संविधानाविषयी माहिती दिली. ७२ वर्षाचा प्रवास, डॉ. बाबासाहेबांचे कार्य, संविधानपूर्व कालखंड, कलमे, परिशिष्ट, रचना संविधानातील भाग, विचार, अभिव्यक्ती, मसुदा समिती, समाजातील एकात्मता, या विषयी मोलाचे मार्गदर्शन केले. संविधान दिना बरोबरच मुंबईवर झालेल्या २६/११/२००८ अतिरेकी हल्ल्याचाही आढावा घेण्यात आला. २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या शूरवीरांवर राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. संदेश गावडे सर यांनी गीत गायन केले. व सर्वांनी या शूरवीरांना श्रद्धांजली वाहिली.
      सदर कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एम. खामकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. संदेश गावडे, प्रा. अंजुम लोखंडे, समिती सदस्य प्रा. नेहा गावडे प्रा. दीपेश केकाने आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे प्रमुख प्रा. भानुप्रसाद विश्वकर्मा सर्व समिती सदस्य ग्रंथपाल संगीता उतेकर, डॉ. बबन सिनगारे, प्रा. पांडे सर, सर्व विभागांचे विभाग प्रमुख, सर्व प्राध्यापक, महाविद्यालय कर्मचारी, विद्यार्थी, यांनी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संदेश गावडे व आभार प्रदर्शन प्रा. अंजुम लोखंडे यांनी केले.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...