कॉ. अमृत महाजन यांची आय टक च्या राज्य उपाध्यक्ष पदी निवड शुभेच्छांचा वर्षाव..
चोपडा, प्रतिनिधी....
कोल्हापूर येथे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस चे 19वे राज्यअधिवेशन नुकतेच पार पडले. त्यात जिल्ह्यातील कामगार नेते कॉम्रेड अमृत महाजन यांच्या यांची पुढील तीन वर्षासाठी उपाध्यक्ष म्हणून सलग तिसऱ्यांदा निवड करण्यात आली.
त्यावेळी त्त्यांच्या चाळीस वर्षातील कामगार व सामाजिक चळवळीतील योगदानाचा गौरवही भाकपाचे राष्ट्रीय नेते काँ भालचंद्र कांगो यांचे हस्ते शाल व सन्मान चिन्ह देऊन गौरवही करण्यात आला करण्यात आला त्यांच्या या स्तुत्य निवडीबद्दल व गौरवाबद्दल भाकपाचे नेते लक्ष्मण शिंदे, गोरख वानखेडे, शांताराम पाटील, वासुदेव कोळी, वाल्मीक मैराले, एकनाथ माळी तसेच कामगार नेते सर्वश्री का राजेंद्र झा, अशोक कुट्टी, जे एन बाविस्कर, वीरेंद्र पाटील पि वाय पाटील, दिनेश राजगिरे आशिष मोरे, अशोक कुट्टी ,प्रसन्ना उटगी ,जे डी ठाकरे, यांचे सह शेकडो अंगणवाडी आशा ग्रामपंचायत कर्मचारी संघटना किसान सभा शेतमजूर युनियन आदिवासी महासभा चे पदाधिकारी सभासद यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.
No comments:
Post a Comment