मरियम मिर्झा च्या 31व्या मोहल्ला बाल वाचनालय चे उद्घाटन !!
*समाज बदलण्यात स्त्रिया मूलभूत भूमिका बजावू शकतात - मिर्झा अब्दुल कय्युम नदवी*
औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि २६ :
जहांगीर कालोनी हरसुल परीसरात सुरू असलेल्या गुलस्तान उर्दू हायस्कूल येथे मरयम मिर्जा मोहल्ला मोहल्ला बाल वाचनालय अभियानां अंतर्गत ३१ व्या बालवाचनालयाचे उद्घाटन रीड अँड लीड फाऊंडेशनचे अध्यक्ष मिर्झा अब्दुल कय्युम यांच्या हस्ते झाले वाचनालयाच्या उद्घाटनप्रसंगी गुलिस्तान शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना आमंत्रित करण्यात आले होते.
ज्यामध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. पालकांना संबोधित करताना प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मिर्झा अब्दुल कय्युम नदवी म्हणाले की, मुस्लिम महिलांनी त्यांचे आरोग्य, मुलांचे शिक्षण, परिसर स्वच्छतेकडे लक्ष दिल्यास समाजात मोठा बदल घडू शकतो. आजकाल पुरुषांपेक्षा स्त्रियांवर जास्त जबाबदारी लादली जाते कारण त्या घरात राहतात तर पुरुष उपजीविकेच्या आणि नोकरीच्या चक्रात घराबाहेर राहतात. शाळेत बाल वाचनालयासह विज्ञान प्रयोगशाळेचेही उद्घाटन शाळेचे अध्यक्ष अस्लम शरीफ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते जावेद पटेल, शेख आसिफ व परिसरातील मशिदीचे इमाम उपस्थित होते.
औरंगाबाद शहरात गेल्या दीड वर्षापासून मरियम मिर्झा मोहल्ला मोहल्ला बाल वाचनालय चळवळीअंतर्गत रीड एंड लीड फाऊंडेशनच्या माध्यमातून ३० बाल वाचनालय सुरू करण्यात आले आहे. विद्यार्थियांना वाचनाची आवड कशी निर्माण करता येईल यासाठी फाऊंडेशनचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. सामान्य जनता आणि शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नवीन पिढीला पुस्तकांशी कसे जोडायचे. फाऊंडेशनच्या अंतर्गत शहरातील उर्दू शाळांमध्ये अनेक उपक्रम राबविले जातात, त्यामुळे समाजात पुस्तकांची आवड निर्माण होऊन विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण झाली. यासाठी काही वेळा विद्यार्थ्यांमध्ये मोफत गल्ले वाटप केले जाते ज्यामध्ये मुले पैसे गोळा करतात आणि या पैशातून त्यांच्या आवडीची पुस्तके खरेदी करतात. कधी ‘घर घर किताब, हर घर में किताब’ या मोहिमेअंतर्गत परिसरात अभ्यासासाठी पुस्तके वाटली जातात.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक व इतर शिक्षकांनी परिश्रम घेतले व इमाम साहेबांच्या प्रार्थनेवर कार्यक्रम संपन्न झाला.
शुक्रिया जनाब बहुत बहुत शुक्रिया अदा
ReplyDelete