अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता स्वाधार योजना !
अकोला, अखलाख देशमुख, दि. २६ : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बॅक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केली आहे. सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतीगृहात प्रवेशासाठी अर्ज केलेल्या व प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांचा या योजनेच्या निवडीसाठी प्राध्यान्याने विचार केला जाईल.
स्वाधार योजनेकरीता इयत्ता 10 वी नंतर 11 वी 12 वी करीता अर्ज करावा. तसेच इयत्ता 12 वी नंतरच्या पदवी/पदवीका अभ्यासक्रम तसेच पदव्युत्तर पदवी/पदवीका अभ्यासक्रमाला प्रवेशीत विद्यार्थ्यांना लाभ अनुज्ञेय राहील. विद्यार्थ्यांना कॉलेज जिथ असेल त्या जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांचकडे अर्ज करता येईल. सन 2021-22 मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी व या योजनेचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांनी आपली उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका या कार्यालयास सादर करावी. महानगरपालिका प्राधिकरणाच्या हद्दीतील पाच कि.मी. परिसरात असलेल्या महाविद्यालयात शिकत असलेले विद्यार्थी देखील योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्र असतील. तसेच विद्यार्थांचे बोनाफाईड, आधार कार्ड, एसएससी व एचएससी, पदवी गुणपत्रिका, डोमेसियल, जातीचा व उत्पन्नाचा दाखला इ. आवश्यक कागदपत्राची पडताळणी करुन अर्ज वाटप करण्यात येईल. तरी विद्यार्थ्यांनी दि. 31 जानेवारी 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सामाजिक न्याय भवन, अकोला येथे अर्जाचा वाटप व स्विकृती सुरु राहिल. अधिक माहितीसाठी समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment