Monday, 26 December 2022

खुलताबाद , वेरूळ येथे ट्रामा केअर सेंटर उभारा - *विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली मागणी*

खुलताबाद , वेरूळ येथे ट्रामा केअर सेंटर उभारा - *विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली मागणी*

नागपूर, अखलाख देशमुख,  दि : -  आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ असलेल्या खुलताबाद,वेरूळ येथे मोठया संख्येने पर्यटक येत असतात. या महामार्गावर होणाऱ्या अपघाताची संख्या पाहता व येथील पर्यटन स्थळाचे आंतरराष्ट्रीय महत्त्व लक्षात घेऊन या परिसरात ट्रामा केअर सेंटर उभारण्यात यावे, अशी मागणी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात केली.
       खुलताबाद, वेरुळ येथे मोठया संख्येने पर्यटक येत असतात. येथे अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना त्वरित उपचार मिळावेत यासाठी नियम व निकष यात बदल करून ट्रामा केअर सेंटर उभारण्यात येईल का ? असा प्रश्न दानवे यांनी आरोग्यमंत्री यांना विचारला. तसेच जिल्हा आरोग्य केंद्रात रिक्त असलेल्या १० जागा त्वरित भरण्याची मागणी देखील त्यांनी केली.

No comments:

Post a Comment

आई जीवदानी कला फाऊंडेशन महाराष्ट्र (रजि.) तर्फे नमन प्रेमींसाठी साहित्य संघ मंदिर येथे बहारदार कार्यक्रमाचे आयोजन !

आई जीवदानी कला फाऊंडेशन महाराष्ट्र (रजि.) तर्फे नमन प्रेमींसाठी साहित्य संघ मंदिर येथे बहारदार कार्यक्रमाचे आयोजन ! प्रतिनिधी - ...