"दत्तजयंती" म्हणजे कबड्डीची थर्रारीची आठवण !!
जेमतेम मी वीस वर्षाचा असेन मुबंईत शालेय शिक्षण घेत असताना अण्णांना विचारुन मी पालवणी या माझ्या गावी दत्तजयंतीला गावी गेलो असता कबड्डीचा आम्ही सराव सुरू केला होता, त्या लालमातीत गावातली मुलं आम्ही एका ठीकाणी जमुन एक कबड्डीचा सराव करायचो, मी दुसरे दोघेजण आम्हाला लोडर म्हणुन वापरात आणण्याचा निर्णय घेतला डिसेबंर महीन्यात "दत्तजयंती" असायची या दत्तजयंतीला लालमातीतला रांगणा खेळ म्हणजे कबड्डी हा खुल्यागटाचा आमचा सामना कालकाई संघ जांबुळ नगर बरोबर आमचा नवनाथ क्रीडामंडळ गोसावीवाडी सामना पहीलाच सुरू झाला, त्यावेळीस आमचा ८ गुणांनी पराभव झाला होता. पण एक अवर्जुन सांगावेसे वाटते दत्तजयंती आली की आम्हाला कबड्डीची एक थर्रारी लागलेली असते. आणि हार जीत ही होतच असते.
मग काय हरल्यानतंर दिवसभर कबड्डी पहात बसायच ही कबड्डी पहाताना ना भुक लागे ना तहान बस्स फक्त कबड्डीच पहात बसायचो, एकदा का अंतिम निर्णायक स्पर्धा झाली, की राञी लवकर घरुन जेऊन यायचो सोबत गरमशर्ट व कान टोपी घेऊन निघायचो कारण संध्याकाळचे पाच वाजले की पहाटे पर्यंत हुरहुरी गुलाबी थंडी सुरूच असायची राञी गुरूदेव दत्ताञंयांची पाळणा सुरू होण्यापुर्वी गावागावातुन दिंडी, भजने, पाळणा, सुरू झालं असता कंटाळा आला की मंदीराच्याच मागे एका मोकळ्या जागेवर ना ना प्रकारची छोटी दुकाने अर्थात चणे, शेंगदाणे, वडपाव, चहा कॉफी, काजुगोळे, चॉकलेट ईत्यादी दुकाने पहायला मिळतात. छान सुबक अशी विद्युत रोषणाईने सजवलेला नेञदिपक मंदीर परीसर हे सगळ पहात असताना मनात जवानीचा सळसळत रक्त असताना एक पेपेरी दोन रुपयाची घेण्याची युक्ती मनात आली पेपेरीचा आवाज फो फो येत होतं मग जे दुकानदार झोपले असतील तिथे जाऊन वाजवत फिरायचो असं करता करता दहा पंधराजण टोळके माझ्यात सामिल झाले मग आम्ही सगळे मिळुन मंदिराच्या इकडे न थांबता आम्ही झोपलेल्या दुकानदारांना पेपेरी वाजऊन ञास देण्याच ठरवलं आणि हा प्रकार सुरू असता जणु काय लग्नाची वरातच फिरते त्या दुकाने असलेल्या ठिकाणी आज माझ वय जरी सत्तेचाळीस असले तरी गावाच्या दत्तजयंतीची जञाही भरायची तमाशे त्याच बरोबर मोठ्या पडध्यावर मोफत सिनेमा पहायला मिळायचा अशाच प्रकारे माझ्या पालवणी गावाच्या आठवणी ही अविस्मरणियच रहाणार.
श्री.गणेश अनंत नवगरे
मुबंई,अंधेरी (पश्चिम)
मोबाईल नबंर ९८६९७१५४१३
No comments:
Post a Comment