Friday, 2 December 2022

समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंजमुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्याची गैरसोय..!

समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंजमुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्याची गैरसोय..!

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि २ : सावंगी येथे समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंजमुळे दोन्ही बाजूकडील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. या समृद्धी महामार्गामुळे शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना लांबचा फेरा घेऊन जावे लागत आहे. 

यासंदर्भात औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ.कल्याण काळे यांनी MSRDC च्या अधिकाऱ्यांना वारंवार भेटून शेतकऱ्यांची अडचण सांगितली होती. या संदर्भात आज कल्याण काळे स्वतः MSRDC च्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन सावंगी येथील समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंजची पाहणी करून नेमकी अडचण त्यांच्या लक्षात आणून दिली.

तसेच शेतकऱ्यांना तात्काळ पर्यायी रस्ता करून द्यावा अशी मागणी काळे यांनी यावेळी केली. या मागणी संदर्भात MSRDC च्या अधिकाऱ्यांनी अनुकूलता दर्शवली असून लवकरच पर्यायी मार्ग करून देण्यात येईल, असे आश्वाशीत केले.

No comments:

Post a Comment

शाहीर जयंत चव्हाण (बापू) कलगी तुरा शाहिरी पुरस्कार २०२५ ने सन्मानित !!

शाहीर जयंत चव्हाण (बापू)  कलगी तुरा शाहिरी पुरस्कार २०२५ ने सन्मानित !! मुंबई (शांताराम गुडेकर)               बालपणापासून गायन व...