Friday, 2 December 2022

अ_र_अंतुले -

अ_र_अंतुले -

एखादी व्यक्ती अधिकार पदावर किती काळ होती त्यापेक्षा त्यांची कारकीर्द कशी होती यावरच त्या व्यक्तीचे मुल्यमापन होऊ शकते. चाळीस वर्षापूर्वी अशाच एका धडाकेबाज आणि तितक्याच वादग्रस्त व्यक्तीने आपले मुख्यमंत्रीपद गाजवले. ती व्यक्ती होती बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले !

जून १९८० ते जानेवारी १९८२ असे केवळ १८ महिने ते पदावर होते. पण या अल्प काळात त्यांनी असे काही धडाकेबाज निर्णय घेतले की लोक अजून त्यांची आठवण काढतात.

मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा सत्कार जालना येथे तत्कालीन खासदार बाळासाहेब पवार यांनी आयोजित केला होता. औरंगाबाद विमानतळावरुन जालन्याकडे जात असताना अंतुले साहेबांनी बाळासाहेबांना विचारले की तुमच्या काही मागण्या असतील तर अवश्य सांगा. बाळासाहेब म्हणाले स्वतंत्र जालना जिल्हा व्हावा अशी आमची अनेक दिवसांपासुनची मागणी आहे. तेव्हा अंतुले म्हणाले माझ्या अगोदर तुमचे भाषण होईल तेव्हा तुम्ही तशी मागणी करा म्हणजे मला घोषणा करता येईल . आणि त्यांनी खरोखर भाषणातच जाहीर करुन टाकले की येत्या १ मे पासून जालना जिल्हा आस्तित्वात येईल. त्यांनी घेतलेले काही निर्णय याप्रमाणे होते..

* कुलाबा जिल्ह्याचे नामकरण 'रायगड' केले. 
* शिवनेरी गडावर शासकीय शिवजयंती उत्सवाला सुरुवात केली. 
* छत्रपती शिवाजी महाराजांच्या भवानी तलवारीसाठी थेट इंग्लंडच्या महाराणीपर्यंत पाठपुरावा केला.
* मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा स्थापन केली. 
* महाराष्ट्रातील 105 गावात हुतात्मा स्मारकांची निर्मिती आणि हुतात्म्यांच्या वारसांना, स्वातंत्र्यसैनिकांना मानधन देण्याचा, त्यांच्या वारसांना शासकीय सेवेत घेण्याचा निर्णय घेतला. 
* पोलीसांचा गणवेश बदलवून हाफ पँट ऐवजी फुल पॅंट असा केला.
* जालना, लातूर आणि सिंधुदुर्ग जिल्हा निर्मिती
* जनता दरबार सुरू करून नागरिकांच्या अडचणी थेट जाणून घेणारे पहिले मुख्यमंत्री.
* निराधार लोकांसाठी संजय गांधी निराधार योजना सुरू केली.
* शेतकऱ्यांना ६५ कोटी रुपयांची कर्जमाफी दिली. 
इतके धडाकेबाज निर्णय, तेही अवघ्या अठरा महिन्यांच्या कारकीर्दीत!

"पै. अ. र. अंतुले"ना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन‌ !

शब्दांकन : पंजाबराव देशमुख

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...