बविआ जव्हार तालुका अध्यक्ष एकनाथ दरोडा यांनी घेतली जि.प.शाळांची भेट !
जव्हार, जितेंद्र मोरघा :
बहुजन विकास आघाडी जव्हार तालुका अध्यक्ष एकनाथ दरोडा यांनी जिल्हा परिषद शाळाम पवारपाडा येथे भेट देऊन ९ वी व १० वी साठी शिक्षक बोर्डाची परीक्षा जवळ आली असताना सुधा उपलब्ध नाही अशी आशयाची बातमी वृत्तपत्रातून छापून आली होती. हे कळताच आज जिल्हा परिषद शाळा पवारपाडा येथे भेट देऊन तेथील शिक्षक व विद्यार्थी यांच्याशी सवांद साधला असता ,तेथील शिक्षकाने बोलताना सांगितले की , गेल्या वर्षभरापासून आम्ही पंचायत समिती येथे पाठपुरावा करतो परंतु अजून शिक्षक उपलब्ध झाला नाही पण ग्रामपंचायत कौलाळे यांच्या सहकार्याने या ठिकाणी गावातील शिक्षक उपलब्ध झाला आहे . गेल्या २ वर्षापासून शाळेला येणारे अनुदान मिळाले नाही अशी खंत शिक्षकाने बोलताना सांगितले.तेथील १० वी त शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना बरोबर सवांद साधला असता परीक्षा जवळ आली आहे अजून शिक्षक नसल्यामुळे आमचे शैक्षनिक नुकसान झाले आहे .आता पर्यंत गणित व भूमीत चे दोन दोन प्रकरणे शिकवून झाले आहेत तरी आम्हाला लवकरात लवकर शिक्षक उपलब्ध करून द्यावा .या बाबतीत मी लगेच जव्हार पंचायत समितीचे कार्यशील गट विकास अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता तात्पुरती तेथील गावातीलच एका मुलाला नियुक्ती देण्यात आली आहे.त्यावर मी बोलताना सांगितले की आता पूर्ण अभ्यासक्रम शिकवणे शक्य नाही वेळ कमी राहिला आहे आता सराव परीक्षा सुरू होणे अपेक्षित आहे . ज्यादा तासिका घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करण्यात यावे, असे सांगितले त्यावर गटविकास अधिकारी यांनी सांगितले की, लवकरच मार्ग काढून ज्यादा तासिका ची व्यवस्था करून देऊ.यावेळी नांदगाव ग्रामपंचायत चे सदस्य संतोष भला. कौलाळे ग्रामपंचायत सदस्य अंजली दिघा व हिरवा देव सेवाभावी संस्थेचे सदस्य रवी सुतक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment