Friday, 2 December 2022

जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी तारपा वादक भिकल्या धिंडांचा गौरव करत केली आर्थिक मदत !

जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी तारपा वादक भिकल्या धिंडांचा गौरव करत केली आर्थिक मदत !

*आदिवासी समाजाच्या रत्नांच्या सदैव पाठीशी*

जव्हार, जितेंद्र मोरघा :

जव्हार- केंद्र सरकारचा मानाचा अमृत पुरस्कार नुकताच जाहीर झालेले आदिवासी समाजाचे रत्न महान तारफा वादक भिकल्या लाडक्या धिंडा यांचा जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी जिल्हा परिषद पालघर येथे यथोचित सन्मान करत त्यांना आर्थिक मदत केली आहे.
          यावेळी भिकल्या धिंडा यांनी अध्यक्ष निकम यांच्याकडे सायकलची मागणी केली असून लवकरच तारफा वादक धिंडा यांना सायकल जाईल असे प्रकाश निकम म्हणाले आहेत.
         माध्यमांशी बोलताना धिंडा म्हणाले आहेत की लोक येतात, ट्राफि देतात,पुरस्कार देतात पण आर्थिकदृष्टया मदत करत नाहीत. सन्मानाबद्दल मी लोकांचा आभारी आहे.परंतु आर्थिक मदतीची सुद्धा मला अपेक्षा आहे असे धिंडा म्हणाले. 
          यावेळी प्रकाश निकम म्हणाले की,भिकल्या धिंडा हे आदिवासी समाजाचे रत्न असून ते मला माझ्या वडीला समान आहेत. यापुढे भिकल्या धिंडांनी कुठलीही आर्थिक मदत मागितल्यास माझ्याकडून ती दिली जाईल असे प्रकश निकम म्हणाले आहेत.भिकल्या धिंडा हे आदिवासी समाजाचे रत्न असून ते प्रचंड कष्टाळू आहेत.त्यांची कष्ट करण्याची तयारी, जिद्द,चिकाटी उत्साह तरुणांना लाजवेल असा आहे.मी आदिवासी समाजातील तरुणांना आवाहन करतो की त्यांनी 89 वर्षाच्या भिकल्या मामांचा आदर्श घेऊन योगा व व्यायामाच्या माध्यमातून शरीर संपत्ती कमवा. ज्या क्षेत्रात रुची असेल त्या क्षेत्रात नावलौकिक कमवा व समाजाची आणि राष्ट्राची सेवा करा.
        यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम भिकल्या लाडक्या धिंडा यांना आर्थिक मदत करण्याचं आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...