तहसिलदार यांनी घेतली मोखाडा उपसभापती प्रदिप वाघ यांची भेट !
जव्हार जितेंद्र, मोर्चा :
मोखाडा तालुक्यातील तहसीलदार खेंगले यांनी तालुक्याचे नवनिर्वाचित उपसभापती प्रदीप वाघ यांची भेट घेतली यावेळेस विविध विषयांवर चर्चा केली.
यामध्ये प्रामुख्याने रोजगार हमी योजनेची कामे, रोजगार सेवक यांच्या मागण्या, शालेय विद्यार्थी यांचे दाखले, निराधार योजना ची प्रकरणे मंजूर करुन अनुदान देणे, घरकुल लाभार्थी अडचणी इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी सुर्यमाळ सरपंच गीता दशरथ पाटील,बोटोशी सरपंच संजना दापट, ग्रामपंचायत सदस्य दशरथ पाटील, गणेश खादे इत्यादी पदाधिकारी व पंचायत समिती चे अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment