Tuesday, 27 December 2022

*मनपा आदर्श शाळा, नारेगाव* - इयत्ता पाचविच्या विद्यार्थ्याना युनिव्हर्सल फर्निचर कारखान्याची क्षेत्रभेट !

*मनपा आदर्श शाळा, नारेगाव* - इयत्ता पाचविच्या विद्यार्थ्याना युनिव्हर्सल फर्निचर कारखान्याची क्षेत्रभेट !

          औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि २७ : व्यावसायिक क्षेत्राचा विस्तार अगदी वेगाने होताना दिसत आहे.दररोज नवनवीन पद्धतीचे व्यवसाय उदयास येत आहे. विद्यार्थ्यांना परिसरातील व्यवसायांची माहिती व्हावी या उद्देशाने दिनांक 26 डिसेंबर 2022 रोजी इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांची नारेगाव परिसरातील युनिव्हर्सल फर्निचर कारखाना या ठिकाणी क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले. 

        दुपारी ठिक बारा वाजता सर्व विद्यार्थी व शिक्षक नियोजित ठिकाणी पोहोचले. युनिव्हर्सल फर्निचर कारखान्याचे मालक सय्यद एजाज  यांनी त्यांच्या कारखान्यात तयार होणाऱ्या उत्पादनाविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. लोखंडी फर्निचर तयार करताना वस्तूच्या प्रकारानुसार पत्र्याची जाडी किती असावी, पत्र्याला आकार कसा देतात, यासाठी कोणकोणत्या मशनरी वापरतात हे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दाखवले. त्याचप्रमाणे  लाकडी फर्निचर जसे- सोफा, दिवान, खुर्ची तयार करताना कोणकोणते साहित्य वापरतात, तयार झालेल्या वस्तूंना रंग कसे देतात, या वस्तू तयार करताना लागणारा कच्चामाल कोठून आणतात याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. वस्तूंच्या पुर्नवापरासंबंधात पर्यावरण पूरक प्रश्न विद्यार्थ्यांनी येथील कारागिरांना विचारले. त्यांनी देखील या संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती दिली. कच्चा माल, वस्तूंचे उत्पादन, तयार झालेल्या वस्तूंची विक्री, या सर्व प्रक्रियेसाठी येणारा खर्च याविषयी विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.

             शाळेच्या मुख्याध्यापिका  संगीता ताजवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली. यासाठी  शाळेतील शिक्षक फिरोज खान पठाण सर, शिक्षिका श्रीम. शुभांगी जोशी श्रीम. ज्योती गुळवे श्रीम. आशा पुरी यांनी क्षेत्रभेटीच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. त्याचप्रमाणे युनिव्हर्सल फर्निचर कारखान्याचे मालक सय्यद एजाज,  कारागीर शेख समीर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment

मायक्रोलिंक कॉम्प्युटर्स घाटकोपर येथे मोफत कॉम्प्युटर्स डिप्लोमा व सारथी योजनेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

मायक्रोलिंक कॉम्प्युटर्स घाटकोपर येथे मोफत कॉम्प्युटर्स डिप्लोमा व सारथी योजनेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ! घाटकोपर, ...