Tuesday, 27 December 2022

भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या विरोधात टाळ वाजवून विरोधी पक्षाचे अनोखे आंदोलन !

भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या विरोधात टाळ वाजवून विरोधी पक्षाचे अनोखे आंदोलन ! 

नागपुर, अखलाख देशमुख, दि २७ :  शेतकरी हैराण सरकार खातो गायरान... खोके लुटा कधी गायरान लुटा... सुरतला चला कधी गुवाहटीला चला... ५० द्या कुणी ८२ द्या, शिंदे सरकारला द्या...भूखंड घ्या कुणी गायरान घ्या सत्तारला द्या कुणी राठोडला द्या... गद्दार बोलो कभी सत्तार बोलो... राजीनामा द्या राजीनामा द्या,भूखंडाचा श्रीखंड खाणारे राजीनामा द्या... जनतेकडून पैसे घेणार्‍या अब्दुल सत्तार यांचा निषेध... अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी आजही भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या व सरकारच्या विरोधात आंदोलन केले. 

आज अधिवेशनाचा सातवा दिवस असून विरोधी पक्षनेते अजितदादा पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या आमदारांनी ईडी सरकारमधील मंत्र्यांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. विधानपरिषदेच्या आवारातून ही दिंडी विधानसभेच्या पायर्‍यांवर काढण्यात आली. टाळच्या आवाजाने विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.

No comments:

Post a Comment

मायक्रोलिंक कॉम्प्युटर्स घाटकोपर येथे मोफत कॉम्प्युटर्स डिप्लोमा व सारथी योजनेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

मायक्रोलिंक कॉम्प्युटर्स घाटकोपर येथे मोफत कॉम्प्युटर्स डिप्लोमा व सारथी योजनेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ! घाटकोपर, ...